मुंबई, 30 मे : कोरोनाच्या दुसर्या लाटेत (Corona Second Wave) रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सध्या तरी लस हा एकमेव पर्याय दिसत आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकाचं लसीकरण (vaccination) करण्यावर सरकार भर देतंय. याचदरम्यान ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांना लगेच लस घेण्याची गरज नसल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्ष आणि एम्सचे प्रोफेसर डॉ. संजय राय (Dr. Sanjay Rai) म्हणाले, की जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांना लगेच लस घेण्याची गरज नाही. त्यांच्या मते शरीरातील नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती कोणत्याही लसीच्या तुलनेत जास्त प्रभावी असून दीर्घ काळ टिकते.
डॉ. राय म्हणाले, की सरकारने कोणत्या भागात किती लसीकरण झालंय, याबाबत आकडेवारी गोळा करावी. झिरो सर्व्हिलन्सच्या (Zero Surveillance) माध्यमातून याची माहिती मिळू शकते. ही सिरमची चाचणी आहे. त्याआधारे ज्या भागात किंवा परिसरात 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना कोरोना होऊन गेला आहे, अशा परिसरातील निर्बंध हटवून टाकायला पाहिजे. तर दुसरीकडे ज्या भागांत केवळ 10 ते 15 टक्के लोकांनाच कोरोनाची लागण झाली आहे, अशा भागांत कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरता लसीकरण मोहीम (Vaccination) वाढवायला पाहिजे. यामुळे लसीचा तुटवडा कमी होण्यास मदत होईल. आतापर्यंत कोरोना होऊन गेलेल्या लोकांकडून जी माहिती गोळा करण्यात आली आहे, त्यानुसार एकदा कोरोनातून बरं झाल्यानंतर 9 महिने संरक्षण (Protection) मिळतं. डॉ. राय यांच्या मते, शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणारी रोगप्रतिकारशक्ती (Natural Immunity Power) ही लसीच्या तुलनेत जास्त काळ टिकते आणि आपला संसर्ग होण्यापासून बचाव करते.
कोरोनाची दुसर्यांदा लागण होण्याचा धोका
डॉ. राय यांना जेव्हा विचारलं की अनेकदा कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला पुन्हा लागण होण्याची शक्यता असते का? त्यावर ते म्हणतात की, लागण होण्याचा धोका असतो. मात्र लक्षणं फार सौम्य असतात. ते म्हणाले, की मी माझ्या अभ्यासात असं बघितलंय की कोरोना होऊन गेलेल्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढली त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका फार कमी होता. तुलनेनी लस घेतल्यानंतर ज्या लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती तयार झाली त्यांना कोरोनाची (corona) लागण लवकर झाली आणि त्यांच्या मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus