मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

आठ महिन्याची वेदिका देत आहे दुर्धर आजाराशी लढा, द्यावे लागणार 16 कोटींचे इंजेक्शन

आठ महिन्याची वेदिका देत आहे दुर्धर आजाराशी लढा, द्यावे लागणार 16 कोटींचे इंजेक्शन

नुकतंच काही दिवसांपूर्वी तिरा कामात नावाच्या एका चार महिन्याच्या चिमुकलीलाही हाच आजार झाल्याचं समोर आलं होतं.

नुकतंच काही दिवसांपूर्वी तिरा कामात नावाच्या एका चार महिन्याच्या चिमुकलीलाही हाच आजार झाल्याचं समोर आलं होतं.

नुकतंच काही दिवसांपूर्वी तिरा कामात नावाच्या एका चार महिन्याच्या चिमुकलीलाही हाच आजार झाल्याचं समोर आलं होतं.

पिंपरी चिंचवड, 07 मार्च : पिंपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) एका आठ महिन्याच्या चिमुकलीला (Vedika Shinde) दुर्धर आजाराने ग्रासलं आहे आणि तिच्या उपचारासाठी तब्बल 18 कोटी रुपयांचा डोंगर उभा करावा लागणार आहे.

वेदिका शिंदे...आई-बाबाच्या कुशीत बागडणाऱ्या गोडुलीला बघता क्षणीच पटकन जवळ घेण्याचा मोह कुणालाच आवरणार नाही. मात्र, वेदीकाला सगळ्यांपासून दूर ठेवलं जातंय कारण तिला SMA म्हणजे स्पायनल मस्क्युलर अट्रोफी टाईप 1 या अतिशय दुर्मिळ आणि दुर्धर आजाराने ग्रासलं आहे आणि तिला या आजारापासून केवळ झोलेजेन्समा नावच एक इंजेक्शन वाचवू शकतं मात्र त्याची किंमत आहे तब्बल 18 कोटी रुपये आहेआणि हे इंजेक्शन मिळविण्यासाठी वेदिकाचे आई-वडील जीवाचं रान करत आहे.

IPL 2021 : कधी आणि कुठे होणार मुंबई इंडियन्सच्या मॅच? 'इथे' वाचा वेळापत्रक

'लवकर इंजेक्शन नाही मिळालं तर तिचा एकएक अवयव निकामी होईल त्याआधी दिला इंजेक्शन देणे गरजेचं आहे' अशी व्यथा वेदीकाच्या आईंने मांडली.

'हे इंजेक्शन बाहेर देशातून आणावं लागेल, त्यामुळे इंजेक्शनची किंमत जास्त आहे. आता मदतच वेदिकाला वाचवू शकते', असं वेदिकाच्या बाबांनी विनंती केली.

नुकतंच काही दिवसांपूर्वी तिरा कामात नावाच्या एका चार महिन्याच्या चिमुकलीलाही हाच आजार झाल्याचं समोर आलं होतं. तिराच्या आई वडिलांनीही निधी उभारणीसाठी लढा दिला आणि समाजातील सर्व घटकांबरोबरच महाराष्ट्रा शासनानेही मदतीचा हात पुढे केला आणि तिरा वाचली.

वेळेत उपचार मिळाला तर महाराष्ट्राची ही दुसरी लेकही आपण वाचवू शकू असा विश्वास वेदिकावर उपचार करणारे डॉक्टर  डॉ.संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या नेत्याला राज ठाकरेंची काळजी; खुलं पत्र लिहून केलं आवाहन

आपल्यासाठी आई बाबा काय कष्ट घेतायत, कोण कोण आपल्या पाठीशी उभं राहतंय. या पैकी कुठल्याही गोष्टीचा लवलेशही नसणाऱ्या या निरागस वेदिकाला असह्य वेदनाही होत असतील पण ती खूप लहान असल्याने सांगू शकत नसेल तेव्हा आपल्यालाच माय बाप बनून तिच्या भावांना समजून घ्याव्या लागतील हे लक्षात घ्या.

आपल्या गोड हसण्याने कुणालाही भुरळ घालणारी वेदिका एक दिवस मृत्यूवरही मात करेल यात शंका नाहीये. फक्त गरज आहे तिच्यावर लवकरात लवकर उपचार होण्याची आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीची. वेदिकाला मदत करायची असल्यास आपण +91 99220 98885 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

First published:

Tags: Baby hospitalised, Emotional, Maharashtra, Pimpari chinchavad, Pune, Shocking news