मुंबई, 7 मार्च : पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ची टीम यंदाही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सनं मागच्या दोन आयपीएल स्पर्धेचं विजेतपट पटकावले असून त्यांनी यंदा सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या टीमची पहिली लढत ही 9 एप्रिल रोजी विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी (RCB) चेन्नईमध्ये होणार आहे. याच मॅचपासून आयपीएलचा 14 वा सिझन ( IPL 2021)सुरु होणार आहे. यंदा सर्व मॅच ह्या त्रयस्ठ ठिकाणी होणार असल्यानं मुंबईकरांना मुंबई इंडियन्सचा खेळ वानखेडे स्टेडियमवर पाहता येणार नाही. मुंबई इंडियन्सच्या मॅचचं संपूर्ण वेळापत्रक
- मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 9 एप्रिल - चेन्नई
- मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - 13 एप्रिल - चेन्नई
- मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 17 एप्रिल - चेन्नई
- मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स - 20 एप्रिल - चेन्नई
- मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज - 23 एप्रिल - चेन्नई
- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - 29 एप्रिल - दिल्ली
- मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स - 1 मे - दिल्ली
- मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 4 मे - दिल्ली
- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - 8 मे - दिल्ली
- मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - 10 मे - बंगळुरु
- मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज - 13 मे - बंगळुरु
- मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स - 16 मे - बंगळुरु
- मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 20 मे - कोलकाता
- मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स - 23 मे - कोलकाता
( वाचा : BCCI ने केली आयपीएलच्या तारखांची घोषणा, पहिलाच सामना मुंबईचा ) मुंबई इंडियन्सचे सामने चेन्नई, दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता या चार शहरांमध्ये होणार आहेत. या स्पर्धेची बाद फेरी 25 मे पासून अहमदाबादमध्ये सुरु होणार असून 30 मे रोजी अहमदाबादमध्येच या स्पर्धेची फायनल होणार आहे.