Coronavirus: गुड न्यूज! पिंपरी चिंचवडमध्ये 7 बालकांनी कोरोनावर केली मात

Coronavirus: गुड न्यूज! पिंपरी चिंचवडमध्ये 7 बालकांनी कोरोनावर केली मात

संपूर्ण देशात सध्या कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 2 मे: संपूर्ण देशात सध्या कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात या रोगामुळे अनेकांनी आपले प्राण गमावावे लागले असतान पिंपरी चिंचवडमधून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधित असलेल्या 7 बालकांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. या बालकांनी शनिवारी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या दाखल असलेल्या इतर 9 बालकांची प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे.

हेही वाचा..महानगरातील 'हॉटस्पॉट' कोरोनामुक्त करण्यासाठी या अधिकाऱ्याचा 'मास्टर प्लान'

कोरोनामुक्त झालेल्या 7 बालकांपैकी आधी तिघांना तर आज चार बालकांना डिस्चार्ज देण्यात आला. 17 एप्रिल रोजी या बालकांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या बालरोग विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यामध्ये रूपीनगर निगडी मधील 5 तर भोसरी येथील 2 बालकांचा समावेश होता. या बालकांना वेळोवेळी योग्य उपचार देण्यात आले. 14 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.

उपचारादरम्यान दोन बालकांच्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण 30000 व 66000 ने कमी झाल्याने डॉक्टर्सची चिंता वाढली होती. कारण सशक्त बालकांमध्ये हे प्रमाण 1500000 च्या वर असते. मात्र, डॉक्टर्स डगमगले नाही. त्यांच्यावर यशस्वीपणे उपचार करत केवळ सात दिवसांतच त्यांच्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण पूर्ववत आणलं. बालरोग अतिदक्षता विभागात त्यांच्या मातांसोबत ठेऊन माता व बालकांच्या 14 दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळ घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे शनिवारी या बालकांना घरी सोडण्यात आले.

हेही वाचा.. आता हेच बाकी होतं.. गावी जाण्यासाठी आतुर असणाऱ्या कामगारांची होतेय लूट!

यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. दिपाली अंबिके, डॉ.सुर्यकांत मुंडलोड सर्व निवासी डॉक्टर्स, स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे या बालकांना पुनर्जन्म मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. बालरोग विभागातील या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या अथक परिश्रमाचं आयुक्त श्रावण हर्डीकर,अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व वैद्यकिय अधिक्षक डॉ.अनिकेत लाठी यांनी कौतुक केलं आहे.

First published: May 2, 2020, 7:06 PM IST

ताज्या बातम्या