मराठी बातम्या /बातम्या /पुणे /किरण गोसावीवर आणखी 5 गुन्हे दाखल, कोठडीच मुक्काम वाढला

किरण गोसावीवर आणखी 5 गुन्हे दाखल, कोठडीच मुक्काम वाढला

न्यायालयाने गोसावी याला अजून 3 दिवसांची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

पुणे, 05 नोव्हेंबर : मुंबई ड्रग्स प्रकरणात (mumbai drug party case) अटकेत असलेल्या पंच किरण गोसावीचा (kiran gosavi) पाय आणखी खोलात गेला आहे. गोसावीचा आणखी प्रताप समोर आले असून राज्यात त्याच्याविरोधात 5 गुन्हे दाखल झाले आहे. त्याचबरोबर त्याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.

आर्यन खान अटक आणि मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला देण्यात आलेली आठ दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. गोसावी याने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेनसिंग रिपोर्टची गरज असल्याची शक्यता असल्याने न्यायालयाने गोसावी याला अजून 3 दिवसांची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

अ‍ॅटमबॉम्बने घेतला पुण्यातील तरुणाचा जीव; दुर्दैवी घटनेत दिवाळीदिवशीच झाला अंत

त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या 4 गुन्ह्यासह राज्यातील इतर भागात ही गोसावी याच्यावर 5 गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, किरण गोसावीला पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्याचे आणखी कारनामे समोर आले आहे. तरुणांना परदेशात नोकरीच्या आमिष दाखवून त्याने चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाला फसवलं होतं.

पुणे पोलिसांनी किरण गोसावीच्या ठाण्यातील घराची आणि ऑफिसची झडती घेतली असून तपासादरम्यान त्याने चिन्मय देशमुखसारख्याच अनेक तरूणांना फसवल्याचं समोर आलंय. गोसावीवर आता पुण्यातच फरासखान्यासह आणखी तीन ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहे.

'...तर खेळून काहीच उपयोग नाही' असं स्कॉटलंडसोबतच्या लढतीपूर्वी रोहित का म्हणाला?

त्याच्याविरोधात लष्कर आणि वानवडी  पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन असे मिळून चार फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.  परदेशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाला 3 लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी किरण गोसावीला अटक केली आहे. याआधी त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात 3 वर्षांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तो फरार होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस बजावली होती. अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडल्यानंतर त्याने ज्यांना ज्यांना फसवले त्यांनी समोर येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं.

First published:
top videos