मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अ‍ॅटमबॉम्बने घेतला पुण्यातील तरुणाचा जीव; दुर्दैवी घटनेत दिवाळीदिवशीच झाला अंत

अ‍ॅटमबॉम्बने घेतला पुण्यातील तरुणाचा जीव; दुर्दैवी घटनेत दिवाळीदिवशीच झाला अंत

(Representative Image: AFP File Photo)

(Representative Image: AFP File Photo)

Crime in Pune: फटाके फोडत असताना पुण्यातील एका वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

पुणे, 05 नोव्हेंबर: सध्या देशात सर्वत्र मोठ्या उत्सहाने दिवाळी सण (Diwali festival) साजरा केला जात आहे. देशातील वाढत्या प्रदुषणाचा धोका लक्षात घेऊन अनेक राज्यांमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर बऱ्याच राज्यात स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असताना राज्यात फटाके फोडताना अपघात (Accident while exploding firecrackers) झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला पेटता फटाका डोळ्याला लागल्याने हिंगोलीतील एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलाचा डोळा निकामी झाला होता.

ही घटना ताजी असताना पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक वीस वर्षीय तरुण फटाके फोडत असताना, जवळील पत्रा उडून गळ्याला लागल्याने त्याचा दुर्दैवी अंत (Young man died while exploding firecrackers) झाला आहे. ही घटना घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी संबंधित तरुणाला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात गेलं असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे.

हेही वाचा-Shocking VIDEO: गटारावर फटाके फोडताना अचानक उडाला भडका, घटनेचा ...

रोहन अनिल मल्लाव असं मृत पावलेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातील काची आळी परिसरातील रहिवासी आहे. मृत रोहन गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या काही मित्रांसोबत फटाके फोडत होता. यावेळी एक अ‍ॅटमबॉम्ब फुटला आणि त्याजवळ पडलेला पत्र्याचा एक तुकडा थेट रोहनच्या गळ्यावर (slit throat with iron sheet) येऊन आदळला.

हेही वाचा- फटाके फोडताना सावधान ! पेटता फटाका डोळ्याला लागला, हिंगोलीत फटाक्यामुळे 9 वर्षीय मुलाने गमावला डोळा

ही घटना इतकी भयावह होती की, यामध्ये रोहनचा पूर्ण जबडाच कापला गेला. पुढच्याच क्षणात रक्तबंबाळ झालेला रोहन जमिनीवर कोसळला. यावेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या अन्य तरुणांनी रोहनला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी रोहनची तपासणी करून त्याला मृत घोषित केलं आहे. ही घटनेची माहिती रोहनच्या कुटुंबीयांना कळताच त्यांना धक्का बसला आहे. ऐन दिवाळीत फटाके फोडताना मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Pune