34 वर्षीय महिलेनं दिला 3 बाळांना जन्म, 2 मुलं आणि 1 मुलीचा समावेश!

पाच वर्षांपूर्वी याच महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. सोमवारी सकाळी या महिलेने पुन्हा 3 बाळांना जन्म दिला.

पाच वर्षांपूर्वी याच महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. सोमवारी सकाळी या महिलेने पुन्हा 3 बाळांना जन्म दिला.

  • Share this:
पुणे, 22 जून:  पुणे जिल्ह्यातील (pune) जुन्नर तालुक्यातील (Junner) हिवरे खुर्द येथील एका 34 वर्षीय महिलेने तब्बल 3 बाळांना जन्म (woman gives birth to 3 babies) दिला आहे. पाच वर्षांपूर्वी याच महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता.  सोमवारी सकाळी या महिलेने पुन्हा 3 बाळांना जन्म दिला असून बाळ व बाळंतीण सुखरुप आहे. एकाच वेळी तिन बाळांना जन्म देणारी ग्रामीण भागातील ही दुर्मिळ घटना आहे. हिवरेखुर्द येथील जोस्त्ना विठ्ठल वायकर यांनी पाच वर्षांपूर्वी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा मूल होणे शक्य नव्हते. मात्र त्यांना त्यांच्या एका नातेवाईकांनी चौदा नंबर येथील श्री हाॅस्पिटल (Shri Hospital Junner) या ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ते उपचारासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांना डाॅ अविनाश पोथरकर (Dr. Avinash Potharkar) व डाॅ मुक्तांजली पोथरकर (Dr. Muktanjali Potharkar) यांनी दिलासा दिला व होमिओपाथी उपचार सुरू केले. या उपचाराने त्यांना पुन्हा दिवस गेले त्यानंतर त्यांनी दोनवेळा सोनोग्राफी केली, त्यावेळी त्यांना सोनोग्राफीत तीन मुले असल्याचे आढळून आले त्यामुळे डाॅक्टरांची चिंता वाढली होती. WTC Final : पाऊस बघून पीटरसनची सटकली, ICC वर साधला निशाणा डाॅ अविनाश पोथरकर व डाॅ मुक्तांजली पोथरकर यांनी त्यांच्या अभ्यासानुसार, होमिओपाथीचे उपचार पुढे तसंच सुरू ठेवले व त्यानंतर जोस्ना यांना बाळंतपणासाठी डाॅ पोथरकर यांनी हाॅस्पिटलला दाखल करुन घेतले. सोमवारी 21 जून रोजी सकाळी जोस्तना यांनी तीन बाळांना सुखरुप जन्म दिला. यामध्ये 2 मुले व 1 मुलगी आहे त्यांची सर्वांची वजने 2 किलोपेक्षा जास्त आहेत. कोणावरही विश्वास ठेवताना या 3 गोष्टींचा विचार करा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ एकाच वेळी तीन बाळांना जन्म देणारी ग्रामीण भागातील ही दुर्मिळ घटना आहे. बाळ व बाळंतीण सुखरुप असल्याचे डाॅ.पोथरकर यांनी सांगितले. या बाळांना व बाळाच्या आईला सुखरुप ठेवण्यासाठी डाॅ.अविनाश पोथरकर व डाॅ.मुक्तांजली पोथरकर यांच्याबरोबरच जुन्नर येथील शिंगोटे हाॅस्पिटलचे डाॅ.प्रसाद शिंगोटे, डाॅ.मोनाली शिंगोटे व आळेफाटा येथील बालरोग तज्ञ डाॅ.कसबे यांनी विशेष काळजी घेतली. होमिओपाथी उपचाराने वंधत्व निवारण होऊ शकते, असा विश्वास डाॅ.अविनाश व डाॅ.मुक्तांजली पोथरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
Published by:sachin Salve
First published: