Chanakya Niti: कोणावरही विश्वास ठेवताना या 3 गोष्टींचा विचार करा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीतिनुसार (Niti) कोणावरही विश्वास टाकताना त्याच्या स्वभावाची माहिती घ्या.

  • Share this:
    दिल्ली, 22 जून:चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति  कठीण काळामध्ये (Difficult Time)व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. (Chanakya Niti:अहंकाराने सगळी नाती जळून जातात; चांगल्या नातेसंबंधासाठी नम्रता अंग) आचार्य चाणक्य सांगतात कोणत्याही व्यक्तीवर भरोसा करताना 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला सर्व गोष्टी माहिती असतात त्या व्यक्तीवरच भरवसा ठेवावा. त्या व्यक्तीच्या हास्या मागची वेदना, रागमागचे सप्रेम आणि गप्प बसण्याचं कारण. नीतिशास्त्रानुसार ज्या व्यक्ती बद्दल या 3 गोष्टी माहिती असतील त्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा. कारण विश्वास निर्माण व्हायला अनेक वर्षे लागतात मात्र, तो तुटायला एखादा क्षण देखील पुरेसा असतो. त्यामुळे अशाच व्यक्तीवर विश्वास ठेवा ज्या व्यक्तीला तुम्ही पूर्णपणे ओळखत असाल. (साप्ताहिक राशीभविष्य: पौर्णिमा कुठल्या राशीला ठरणार फलदायी?) आचार्य चाणक्य यांच्यामते आपण एखाद्यावर रागवत असतांना त्यामागचं खरं कारण त्या व्यक्तीबद्दल वाटणारी चिंता असते. त्यामुळेच समोरची व्यक्ती आपल्यावर का रागावलेली आहे याचं कारण आपल्याला माहिती असेल तर, वाद होत नाहीत. (शेतमजूर वडिलांच्या मेहनती मुलाची कहाणी; शरण कांबळे यांचं UPSC परीक्षेतलं यश) जिच्यावर आपण विश्वास टाकतो ती व्यक्ती कोणत्या गोष्टीमुळे उदास होते याची माहिती असेल तर, आपण त्या परिस्थितीनुसार वागू शकतो. ती व्यक्ती कोणत्या गोष्टी मी गप्प होते याचं कारण देखील माहीत असणे आवश्यक. म्हणजे तिच्या स्वभावाचा पूर्ण अंदाज असावा. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published: