मराठी बातम्या /बातम्या /पुणे /नर्सचा ड्रेस घालून आली अन् पळवलं चिमुकलीला, ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

नर्सचा ड्रेस घालून आली अन् पळवलं चिमुकलीला, ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

अत्यावश्यक उपचारासाठी अकोला 80 किमी अंतरावर आहे, खामगाव 60 किमी तर शेगाव 45 किमी अंतरावर उपचारासाठी जावे लागत आहे.

अत्यावश्यक उपचारासाठी अकोला 80 किमी अंतरावर आहे, खामगाव 60 किमी तर शेगाव 45 किमी अंतरावर उपचारासाठी जावे लागत आहे.

Crime in pune: पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेनं नर्सच्या वेषात (guise of nurse) जाऊन येथील एका 3 महिन्यांच्या मुलीला पळवलं (Theft 3 months baby girl) आहे.

पुणे, 10 सप्टेंबर: पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेनं नर्सच्या वेषात (guise of nurse) जाऊन येथील एका 3 महिन्यांच्या मुलीला पळवलं (Theft 3 months baby girl) आहे. बाळ गायब झाल्याची माहिती समोर येताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत आरोपी महिलेला आणि तिच्या पतीला अटक केली आहे. तसेच बाळाला आईच्या हवाली करण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

नेमकी घटना काय आहे?

26 वर्षीय आरोपी महिला आपल्या पतीसोबत नर्सचा वेषातर करून ससून रुग्णालयात शिरली होती. याठिकाणी आरोपी महिलेनं संधी साधून एका 3 महिन्याच्या मुलीला वॉर्डातून पळवलं आहे. आपलं बाळ गायब असल्याचं पाहून बाळाच्या आईनं रुग्णालयातच हंबरडा फोडला होता. रुग्णालय प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. त्वरित पोलिसांना याची माहिती दिल्यामुळे नर्सच्या वेशात आलेल्या आरोपी महिलेला आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा-प्रेमप्रकरणात तरुणाला शिक्षा; नातेवाईकांनी पाळत ठेवून लव्ह स्टोरीचा केला The End

तसेच पोलिसांनी बाळाची आरोपींच्या तावडीतून सुटका केली असून तिला सुखरूप आईच्या ताब्यात दिलं आहे. संबंधित महिला मागील काही महिन्यांपासून ससून रुग्णालयात उपचार घेत होती. दरम्यान नर्सच्या वेशात येऊन एका महिलेनं तिच्या बाळाला चोरून नेलं होतं.

हेही वाचा-पुणे हादरलं ! अल्पवयीन मुलीवर 2 महिने सामूहिक बलात्कार

संबंधित चोरट्या दाम्पत्याला मूलबाळ होतं नसल्यानं त्यांनी 3 महिन्यांचं बाळ पळवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळवल्यानं ससून रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या पतीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune