मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात बस प्रवाशांकडून सव्वा कोटी लुटणारे तिघे अटकेत, 72 तासांत दरोड्याचा उलगडा

पुण्यात बस प्रवाशांकडून सव्वा कोटी लुटणारे तिघे अटकेत, 72 तासांत दरोड्याचा उलगडा

Crime in Pune: तीन दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) पाटस टोल नाक्याजवळ (Patas Toll plaza) एक जबरी दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी एसटी बसमधील प्रवाशांकडून तब्बल सव्वा कोटी रुपये (looted bus passenger) लुटले होते.

Crime in Pune: तीन दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) पाटस टोल नाक्याजवळ (Patas Toll plaza) एक जबरी दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी एसटी बसमधील प्रवाशांकडून तब्बल सव्वा कोटी रुपये (looted bus passenger) लुटले होते.

Crime in Pune: तीन दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) पाटस टोल नाक्याजवळ (Patas Toll plaza) एक जबरी दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी एसटी बसमधील प्रवाशांकडून तब्बल सव्वा कोटी रुपये (looted bus passenger) लुटले होते.

पुणे, 06 ऑगस्ट: तीन दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) पाटस टोल नाक्याजवळ (Patas Toll plaza) एक जबरी दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी पोलीस असल्याची बतावणी करत एसटी बसमधील प्रवाशांना लुटलं (looted bus passenger) होतं. यावेळी चोरट्यांनी एका कुरीअर कंपनीचे पैसे घेऊन जाणाऱ्या चार जणांकडून तब्बल 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रुपये लुटून नेले होते. याप्रकरणी संबंधित चार जणांनी यवत पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 72 तासांत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अद्याप तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

रामदास भोसले (30 वर्ष), तुषार तांबे (22 वर्ष), भरत बांगर (36 वर्ष) असं अटक केलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. संबंधित सर्व आरोपी शिरूर तालुक्यातील रहिवासी आहेत. स्थानिक गुन्हे शाखेनं आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करत आरोपींना गजाआड केलं आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 1 कोटी 54 हजार 540 किमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय पोलिसांनी कारवाईत एक स्विफ्ट कार, बुलेट दुचाकी आणि ज्युपिटर दुचाकी देखील जप्त केली आहे. याबाबतची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

हेही वाचा- पुण्यात मृत गुंडाचा जंगी वाढदिवस, कोयते-बंदुका हवेत फिरवत टोळक्याची दहशत, पाहा VIDEO

नेमकं काय घडलं?

तक्रारदार चारजण हे एका कुरिअर कंपनीसाठी काम करतात. संबंधित चारजण आपल्या कंपनीचे 1 कोटीहून अधिक रुपयांची रक्कम घेऊन बसने प्रवास करत होते. कुरिअर कंपनीचे हे चार कर्मचारी निलंगा, लातूर आणि सोलापूर येथून बसमध्ये बसले होते. दरम्यान पुण्यातील पाटस टोलनाक्याजवळ सहाजणांनी या बसला कार आडवी घातली. तसेच पोलीस असल्याची बतावणी करत बसमध्ये शिरले. आरोपींनी प्रवाशांकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 किमतींचा मुद्देमाल लुटला.

हेही वाचा-VIDEO: नवी मुंबईत लुटमार, बंदुकीचा धाक दाखवत सोन्याने भरलेली बॅग केली लंपास

यानंतर हितेंद्र जाधव यांनी यवत पोलिसांत तक्रार लुटीची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या 72 तासांत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय त्यांच्याकडून चोरी गेलेला तब्बल 1 कोटी 54 हजार 540 किमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी हा चोरीचा माल एका उसाच्या शेतात लपवून ठेवला होता. पैसे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीतरी ही माहिती चोरट्यांनी दिली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. शिवाय डिजिटल व्यवहार होत असताना एवढी मोठी रक्कम बसने मुंबईला का घेऊन जात होते ? हा प्रश्नही पोलिसांकडून उपस्थित केला गेला आहे. या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune, Robbery