पुणे, 06 ऑगस्ट: 10 ते 15 जणाच्या टोळक्यानं मयत गुंडाचा वाढदिवस (Dead goon's Birthday) साजरा करून परिसरात दहशत पसरवण्याचा (Spread Terror) प्रयत्न केला आहे. आरोपींनी मयत गुंडाच्या वाढदिवसाला केक कापून बंदुका आणि कोयते हवेत फिरवले आहेत. तसेच फटाक्यांची आतषबाजी करत, मृत गुंडाच्या नावानं घोषणाही दिल्या आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ (Viral Video) आता समोर आली असून पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.
भावेश कांबळे असं संबंधित मयत गुंडाच नाव आहे. काही दिवसांपूर्वी भावशीची हत्या करण्यात आली होती. ही हत्या बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान 7 जुलै रोजी गुंड भावेश कांबळेचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पुण्यातील 10 ते 15 तरुणांनी त्याचा मृत्योत्तर वाढदिवस साजरा केला. आरोपींनी भावेश काबळे याचा फोटो असलेला केक कापत परिसरात फटक्यांची आतषबाजी केली आहे.
हेही वाचा-पुणे: मेडिकलमधून कंडोम आणून न दिल्यानं तरुणाची सटकली; अल्पवयीन मुलावर चाकूनं वार
एवढंच नव्हे तर आरोपींनी गावठी बंदुका, तलवारी आणि कोयते हवेत फिरवून भरस्त्यावर राडा घातला आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी व्हिडीओच्या अधारे एका 22 वर्षीय सराईत गुंडाला अटक केली आहे. अक्षय उर्फ प्रसाद शशिकांत कानिटकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी बंदुक जप्त केली आहे. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पुण्यात मृत गुंडाचा जंगी वाढदिवस, कोयते-बंदुका हवेत फिरवत टोळक्याची दहशत pic.twitter.com/zRUMZ2VjuL
— The मराठी Medium (@MarathiMedium) August 6, 2021
हेही वाचा-प्रियकरानं Video Call वरून दिलं हत्येचं ट्रेनिंग; लेकीनं जन्मदातीचाच काढला काटा
गुंडाचा वाढदिवस साजरा करून दहशत माजवणाऱ्यांपैकी एक आरोपी अक्षय कानिटकर हा बिबवेवाडीतील दत्त मंदिराजवळ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटकेनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला पुढील कारवाईसाठी बिबवेवाडी पोलिसांच्या हवाली केलं आहे. या घटनेचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune