Home /News /pune /

100 रुपयांसाठी मावशीने केलेला अपमान जिव्हारी; पुण्यातील तरुणाने केला हृदयद्रावक शेवट

100 रुपयांसाठी मावशीने केलेला अपमान जिव्हारी; पुण्यातील तरुणाने केला हृदयद्रावक शेवट


शगुणन कुमार पी असं आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. (File Photo)

शगुणन कुमार पी असं आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. (File Photo)

Suicide in Pune: मावशीने शंभर रुपये देण्यास नकार दिल्याने (Aunt refused to give 100 rupees) पुण्यातील एका तरुणाने आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला (Young man commits suicide) आहे.

  पुणे, 03 ऑक्टोबर: मावशीने शंभर रुपये देण्यास नकार दिल्याने (Aunt refused to give 100 rupees) पुण्यातील एका तरुणाने आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला (Young man commits suicide) आहे. अवघ्या 100 रुपयांसाठी तरुणानं जीव दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पिंपरी पोलिसांना देण्यात आली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. शगुणन कुमार पी असं आत्महत्या करणाऱ्या  24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. शनिवारी दुपारी मावशीला 100 रुपये मागितल्याने मावशीने काहीच काम करत नसल्याच्या कारणातून शगुणनला सुनावलं होतं. मावशीनं शंभर रुपयांसाठी केलेला हा अपमान जिव्हारी लागल्याने शगुणनने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. शगुणनने दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. हेही वाचा-पुणे: दाढी करण्यासाठी सलूनमध्ये शिरला अन् चोरट्यानं 2 लाखांवर फिरवला वस्तारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शगुणन हा मुळचा तामिळनाडू येथील रहिवासी आहे. त्याचे आईवडील देखील तिथेच वास्तव्याला आहेत. पण शगुणन हा पुणे परिसरातील पिंपरी येथे आपल्या मावशी आणि बहिणीसह वास्तव्याला आहे. शगुणन हा काहीच काम करत नव्हता. त्यामुळे छोट्या छोट्या कारणासाठी त्याला मावशी किंवा बहिणीकडून पैसे घ्यावे लागत होते. शगुणनची बहीण एका आयटी कंपनीत कामाला आहे. हेही वाचा-पुणे: 3 वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यादेखत कुटुंबानं सोडला प्राण; हृदय हेलावणारी घटना दरम्यान शनिवारी दुपारी शगुणनला कोणत्या तरी कामासाठी शंभर रुपये पाहिजे होते. त्यामुळे त्याने आपल्या मावशीकडे शंभर रुपयांची मागणी केली. पण मावशीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. तसेच दररोज कुठून पैसे द्यायचे या कारणातून मावशीनं शगुणनला ठणकावलं. याच रागातून तो घराच्या दुसऱ्या मजल्यावरील रुममध्ये गेला. याठिकाणी त्याने कुत्र्याच्या बेल्टच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. थोड्या वेळाने शगुणनची मावशी त्याची समजूत घालायला दुसऱ्या मजल्यावर गेली असता, शगुणन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेची माहिती पिंपरी पोलिसांना देण्यात आला असून पिंपरी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Pune, Suicide

  पुढील बातम्या