• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • 3 वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यादेखत आई-वडील अन् धाकट्या बहिणीनं सोडला प्राण; पुण्यातील हृदय हेलावणारी घटना

3 वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यादेखत आई-वडील अन् धाकट्या बहिणीनं सोडला प्राण; पुण्यातील हृदय हेलावणारी घटना

(प्रातिनिधीक फोटो-Shutterstock)

(प्रातिनिधीक फोटो-Shutterstock)

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका 3 वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यादेखत तिच्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

 • Share this:
  शिक्रापूर, 02 ऑक्टोबर: पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून फोनवर बोलणाऱ्या कुटुंबाला भरधाव कंटेनरने जोरदार धडक (Container hits bike) दिली आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला (3 Died from same family) आहे. या दुर्घटनेत 3 वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली असून ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी कंटेनर चालकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अशोक दगडू पवार (वय-45), सारीका अशोक पवार (वय-40) आणि अनु अशोक पवार (वय- 7 महिने) असं अपघातात मृत पावलेल्या कुटुंबाचं नाव आहे. संबंधित सर्वजण जातेगाव बुद्रुक येथील रहिवासी आहेत. तर या घटनेत जखमी झालेल्या 3 वर्षीय चिमुकलीचं नाव शुभ्रा अशोक पवार असं आहे. या दुर्दैवी अपघातात 3 वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यादेखत तिचे आई-वडील आणि 7 महिन्यांच्या धाकट्या बहिणीनं प्राण सोडला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा-बीड: अतिवृष्टीने हाता-तोंडाला आलेला घास हिरावला; 2 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं नेमकं काय घडलं? मृत अशोक पवार आपली पत्नी आणि दोन मुलींना घेऊन शिक्रापूर चाकण रस्त्याने जात होते. दरम्यान जातेगाव फाटा येथून जात असताना त्यांना एक फोन आला. यामुळे पवार यांनी रस्त्याच्या कडेला एका हॉटेलसमोर आपली दुचाकी थांबवली आणि बोलवर बोलू लागले. दरम्यान पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीसह संपूर्ण पवार कुटुंब कंटेनरखाली चिरडलं. सुदैवाची बाब म्हणजे 3 वर्षाची चिमुकली यातून थोडक्यात बचावली. हेही वाचा-आरोपीच्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; पुण्यात PSIकडून 25 वर्षीय युवतीवर रेप ही घटना घडताच स्थानिक नागरिकांनी आरोपी कंटेनर चालकाला पकडलं आणि याची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं. तर तीन वर्षीय जखमी मुलीवर उपचार सुरू आहेत. बालाजी संजय येलगटे असं आरोपी कंटेनर चालकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कंटेनरचालक भरधाव वेगाने आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई केली जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: