उरुळी कांचन, 02 ऑक्टोबर: पुण्यानजीक असणाऱ्या उरळी कांचन येथील एका तरुणासोबत विचित्र घटना घडली आहे. दाढी करून परत येईपर्यंत (Went for shaving) संबंधित तरुणाला तब्बल दोन लाखांचा गंडा (loss 2 lakh) बसला आहे. एका अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून तरुणाचे दोन लाख रुपये लंपास (Theft 2 lakh) केले आहेत. याप्रकरणी तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल (FIR Lodged) केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सुनील यादव असं 25 वर्षीय फिर्यादी तरुणाचं नाव आहे. यादव यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील इलाईट चौकातील अॅक्सिस बँकेतून दोन लाख रुपयांची रक्कम काढली होती. दुपारी एकच्या सुमारास पैसे काढल्यानंतर यादव यांनी ही सर्व रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. यानंतर त्यांनी रस्त्यातील एका खाजगी रुग्णालयासमोर दुचाकी लावून दाढी करण्यासाठी सलूनमध्ये गेला.
हेही वाचा-हद्दच झाली राव! भिवंडीत गटारावरील लोखंडी चेंबरची चोरी; महिला गँगचा VIRAL VIDEO
दाढी करून बाहेर आल्यानंतर यादव आपल्या दुचाकीकडे गेले. याठिकाणी त्यांच्या गाडीची डिक्की उघडी असल्याचं लक्षात आलं. तसेच गाडीच्या डिक्कीत ठेवलेली दोन लाख रुपयांची रक्कम देखील गायब होती. या प्रकारानंतर यादव यांनी आसपासच्या लोकांना याबाबत विचारणा केली. पण कोणीच काहीच पाहिलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. दाढी करून येईपर्यंत कोणीतरी आपल्या दोन लाख रुपयांवर डल्ला मारल्याचं यादव यांच्या लक्षात आलं.
हेही वाचा-मुंबईतील महिलेवर आध्यात्मिक बाबाकडून विकृत कृत्य; नराधमाला गुजरातमधून अटक
यानंतर यादव यांनी त्वरित लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. परीसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Theft