Home /News /pune /

पुणे हादरलं! नशेचं इंजेक्शन देत रॅपरकडून अल्पवयीन मॉडेलवर बलात्कार, एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार

पुणे हादरलं! नशेचं इंजेक्शन देत रॅपरकडून अल्पवयीन मॉडेलवर बलात्कार, एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार

 मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर पुण्यातील एका नराधमानं बलात्कार केला आहे.

मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर पुण्यातील एका नराधमानं बलात्कार केला आहे.

Rape in Pune: मॉडेलिंग क्षेत्रात करिअर (Career in Modeling) करू इच्छिणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर (Minor girl raped by Rapper) पुण्यातील एका नराधमानं बलात्कार केला आहे.

    पुणे, 26 ऑगस्ट: मॉडेलिंग क्षेत्रात करिअर (Career in Modeling) करू इच्छिणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर (Minor girl rape in pune) पुण्यातील एका नराधमानं बलात्कार केला आहे. आरोपीनं नशेचं इंजेक्शन (Injection of anesthesia) देऊन पीडितेवर अत्याचाराच्या परिसीमा गाठल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलीनं हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी तरुण हा मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असून आतापर्यंत त्यानं बऱ्याच तरुणींना काम दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. समीर विजय भालेराव ऊर्फ डॉनी सिंग असं गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी समीर हा रॅपर बॉय असून त्यानं अनेक मुलींना मॉडेलिंगचं काम दिलं आहे. पीडित मुलीला देखील मॉडेलिंगची आवड होती. यातूनच दोघं एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर दोघांत मैत्रीही वाढत गेली होती. हेही वाचा-13 वर्षीय भावाला PORN VIDEO दाखवायची बहिण; पुढे जे घडलं त्यानं मुंबई हादरली दरम्यान आरोपी समीरनं काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीला एकतर्फी प्रेमातून प्रपोज केला होता. पण पीडितेनं प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिला. याचा समीरला राग आला होता. याच रागातून आरोपीनं पीडितेच्या घरी जाऊन पीडितेच्या लहान भावाला धमकावलं. तसेच आरोपीनं पीडितेच्या भावासह तिला बळजबरीनं आपल्या घरी आणलं. याठिकाणी आरोपीनं पीडितेला नशेचं इंजेक्शन दिलं. हेही वाचा-क्रूरतेचा कळस; बलात्कारानंतर नराधमानं पीडितेच्या छातीवर चाकूनं कोरलं स्वतःचं नाव नशेचं इंजेक्शन दिल्यानं पीडितेला गुंगी आली. यानंतर आरोपी समीरनं विकृतीचा कळस गाठत पीडितेवर अत्याचार केला. पीडित अल्पवयीन तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने हिंजवडी पोलीस ठाण्यात जाऊन नराधमाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. हिंजवडी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी समीर भालेराव याच्याविरोधात बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Rape on minor

    पुढील बातम्या