मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे: नातवानं आजीच्या प्रेमाचं फेडलं पांग; क्षुल्लक कारणासाठी दिली भयंकर शिक्षा

पुणे: नातवानं आजीच्या प्रेमाचं फेडलं पांग; क्षुल्लक कारणासाठी दिली भयंकर शिक्षा

Crime in Pune: पुण्यातील एका युवकानं आपल्या आजीला बांबुने आणि हाताने बेदम मारहाण (Young man beat grandmother) करत तिच्यावर चाकूने हल्ला केला आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 04 ऑक्टोबर: पुण्यातील एका युवकानं आपल्या आजीला बांबुने आणि हाताने बेदम मारहाण (Young man beat grandmother) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी नातवानं आजीकडे नशेसाठी पैसे मागितले (Demand money for addiction) होते. पण पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपी नातवानं आजीला ही भयंकर शिक्षा दिली आहे. याप्रकरणी 56 वर्षीय आजीनं खडक पोलीस ठाण्यात नातवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

56 वर्षीय पीडित महिला पुण्यातील लोहियानगर परिसरात वास्तव्याला आहे. तर 18 वर्षीय आरोपी तरुण फिर्यादीच्या मुलीचा मुलगा आहे. 18 वर्षीय आरोपी नातूला विविध प्रकारची व्यसनं आहेत. तसेच तो कोणतंही काम करत नाही. नशेसाठी तो नेहमी आजीकडे पैसे मागत असतो. दरम्यान शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी नातू आपल्या आजीच्या घरी आला होता. यावेळी त्याने आजीकडे नशेसाठी काही पैसे मागितले.

हेही वाचा-अंगावरील साडीच्या पदरानेच आवळला गळा अन्...; नगरमध्ये 30वर्षीय महिलेचा भयावह शेवट

पण नशेसाठी नेहमीच कुठून पैसे द्यायचे म्हणून आजीनं पैसे देण्यास नकार दिला. व्यसनाधिन असलेल्या नातवाला याचा प्रचंड राग आला. आरोपी नातवानं रागाच्या भरात आपल्या 56 वर्षीय आजीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीनं बांबुने फिर्यादीच्या पाठीवर तर हाताने पोटावर मारहाण केली. आरोपी तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं आपल्या आजीवर चाकूने जीवघेणा हल्ला देखील केला आहे.

हेही वाचा-नागपुरात MBA च्या विद्यार्थिनीवर बलात्कार; वाढदिवशी फिरायला नेत केली भलतीच मागणी

ही संतापजनक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं खडक पोलीस ठाण्यात आरोपी नातवाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी मारहाण, खुनाचा प्रयत्न अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास खडक पोलीस करत आहे.

First published:

Tags: Crime news, Pune