Home /News /nagpur /

नागपुरात MBA च्या विद्यार्थिनीवर बलात्कार; वाढदिवशी फिरायला नेत केली भलतीच मागणी

नागपुरात MBA च्या विद्यार्थिनीवर बलात्कार; वाढदिवशी फिरायला नेत केली भलतीच मागणी

नागपुरात एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    नागपूर, 03 ऑक्टोबर: नागपुरात एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून आरोपीची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत अनेकदा अत्याचार (Facebook friend raped MBA student) केला आहे. दरम्यान पीडित तरुणी दोन वेळी गर्भवती राहिली ( become pregnant twice) होती. त्यामुळे आरोपीनं दोन्ही वेळेस गर्भपात करण्यास भाग पाडलं आहे. याप्रकरणी पीडित तरुणीनं कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. रोशन अनिल ठाकरे (वय-29) असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव असून तो कळमना येथील ओमनगर परिसरातील रहिवासी आहे. तर 21 वर्षीय पीडित तरुणी एमबी फायनान्स अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. पीडित तरुणीची दोन वर्षांपूर्वी आरोपीशी फेसबुकवर ओळख झाली होती. यानंतर दोघंही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत होते. दरम्यान, 2020 मध्ये फिर्यादीच्या वाढदिवशी आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवत पंचमढी येथे फिरायला घेऊन गेला. हेही वाचा-नराधमांकडून महिलेवर 15 वर्षे बलात्कार; अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसही हादरले यावेळी रोशनचा एक मित्र आणि त्याची मैत्रिण देखील सोबत होती. फिरायला गेल्यानंतर आरोपीनं पीडितेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. पीडितेनं याला नकार दिला. पण आपण लग्न करणार आहोत, असं सांगून आरोपीनं तिला विश्वासात घेत तिच्यावर अत्याचार केला आहे. यानंतर आरोपीनं पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेत अनेकदा अत्याचार केला आहे. हेही वाचा-14 वर्षीय मुलीसोबत भावांकडून विकृत कृत्य; शाळेतील आरोग्य तपासणीत काळंबेरं उघड यामुळे पीडित तरुणी दोनदा गरोदर राहिली. पीडितेनं याची माहिती आरोपीला दिली असता, त्याने दोन्ही वेळा दबाब बनवून तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं आहे. यानंतर पीडित तरुणीनं आरोपीकडे लग्नाचा तगादा लावल्यानंतर, रोशननं पीडितेच्या विरोधात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्याची फिर्याद दाखल केली. याची माहिती पीडितेला कळताच तिने नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात रोशन विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur, Rape

    पुढील बातम्या