मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

अंगावरील साडीच्या पदरानेच आवळला गळा अन्...; नगरमध्ये 30 वर्षीय महिलेचा भयावह शेवट

अंगावरील साडीच्या पदरानेच आवळला गळा अन्...; नगरमध्ये 30 वर्षीय महिलेचा भयावह शेवट

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 30 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या (30 years old woman brutal murder) करण्यात आली आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 03 ऑक्टोबर: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 30 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या (30 years old woman brutal murder) करण्यात आली आहे. अज्ञात आरोपीनं महिलेच्या डोक्यात जबरी वार (Hit with heavy weapon) करत तिच्या अंगावरील साडीने तिचा गळा आवळला आहे. एवढंच नव्हे तर आरोपीनं महिलेच्या चेहऱ्यावर केमिकल टाकून तिच्या चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

नेमकी घटना काय आहे?

श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील एका शेतातील बांधावर एका 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. आरोपीनं महिलेच्या डोक्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. तसेच आरोपीनं तिच्या अंगावरील साडीनेच तिचा गळा आवळल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर आरोपीनं मृत महिलेचा चेहरा कसल्यातरी केमिकलनं विद्रुप करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली होती. यानंतर गावातील अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा-बापाच्या कृत्याची चिमुकल्याला मिळाली शिक्षा; अखेर कृष्णा नदीत सापडला मृतदेह

या घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. घटनास्थळी येऊन पहाणी केली असता, महिलेची अवस्था पाहून पोलीसांना देखील धक्का बसला आहे. अत्यंत निर्घृणपणे महिलेची हत्या करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह डॉग स्कॉडला पाचारण केलं आहे.

हेही वाचा-14 वर्षीय मुलीसोबत भावांकडून विकृत कृत्य; शाळेतील आरोग्य तपासणीत काळंबेरं उघड

संबंधित मृत महिला नेमकी कोण? आणि तिची हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली? याबाबत कोणतीही माहिती पोलिसांकडे नाही. पोलीस घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत. तसेच डॉग स्कॉडच्या साह्याने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Crime news, Murder Mystery