पुणे, 04 ऑक्टोबर: पुण्यातील बालेवाडी येथे एका बॅडमिंटन प्रशिक्षकानं कोचिंगसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग (minor girl sexual molest by badminton coach) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयित आरोपीनं 14 वर्षीय बॅडमिंटनपटू असलेल्या मुलीला शटल बॉक्स जिममधील लॉकरमध्ये ठेवायला लावलं होतं. त्यानंतर तिच्या पाठीमागे जात आरोपीनं तिच्याशी लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीनं आरोपीच्या तावडीतून स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली आहे. पीडितनं घडलेला संतापजनक प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे.
याप्रकरणी पीडितेच्या आईनं हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR Lodged) केली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला अटक (Accused arrested) केलं आहे. राकेश यशवंत दलाल असं अटक केलेल्या 36 वर्षीय आरोपी प्रशिक्षकाचं नाव आहे. संशयित आरोपीनं शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास पीडित मुलीसोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर बालेवाडीच्या क्रिडा नगरीत एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-14 वर्षीय मुलीसोबत भावांकडून विकृत कृत्य; शाळेतील आरोग्य तपासणीत काळंबेरं उघड
पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास संशयित आरोपीनं पीडित मुलीला शटल बॉक्स जिममधील लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितलं होतं. पीडित मुलगी लॉकरकडे गेली असता, आरोपीही तिच्या पाठीमागे गेला. याठिकाणी आरोपीनं पीडितेशी बोलायला सुरुवात केली. “तू शुक्रवारी खेळायला का येत नाहीस? तू चांगली खेळाडू आहेस, मला तुझा खेळ फार आवडतो. मला तुला फार वरती घेऊन जायचं आहे. तू आज देखील चांगली खेळली आहेस,” असं म्हणत शेकहॅन्ड करण्यासाठी हात पुढे केला.
हेही वाचा-नागपुरात MBA च्या विद्यार्थिनीवर बलात्कार; वाढदिवशी फिरायला नेत केली भलतीच मागणी
प्रशिक्षकाच्या तोंडून कौतुक ऐकल्यानंतर पीडितेनंही शेकहॅन्ड करण्यासाठी हात पुढे केला. पण आरोपीनं तिला मिठीत घेतलं. यावळी घाबरलेल्य अल्पवयीन मुलीनं स्वत:ची सुटका करत तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. पण संशयित आरोपी तिला रोखण्याचा प्रयत्न करू लागला. पण पीडित तरुणी तिथून निघून गेली. यानंतर पीडितनं घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune