मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /14 वर्षीय मुलीसोबत दोन भावांकडून घृणास्पद कृत्य; शाळेत झालेल्या आरोग्य तपासणीत काळंबेरं उघड

14 वर्षीय मुलीसोबत दोन भावांकडून घृणास्पद कृत्य; शाळेत झालेल्या आरोग्य तपासणीत काळंबेरं उघड

Rape in Gadchiroli: गडचिरोलीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच मामेभावाने आणि आत्येभावानं अत्याचार केल्याचा (14 years minor school girl raped by 2 brothers) संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Rape in Gadchiroli: गडचिरोलीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच मामेभावाने आणि आत्येभावानं अत्याचार केल्याचा (14 years minor school girl raped by 2 brothers) संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Rape in Gadchiroli: गडचिरोलीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच मामेभावाने आणि आत्येभावानं अत्याचार केल्याचा (14 years minor school girl raped by 2 brothers) संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

गडचिरोली, 03 ऑक्टोबर: गडचिरोली जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच मामेभावाने आणि आत्येभावानं अत्याचार केल्याचा (14 years minor school girl raped by 2 brothers) संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी गडचिरोली तालुक्याच्या दक्षिणेतील एका आश्रमशाळेची विद्यार्थिनी आहे. या शाळेत पीडितेची आरोग्य तपासणी केली असताना हे धक्कादायक सत्य समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक (2 accused arrested) केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

या घटनेत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयाच्या आदेशानुसार आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तर अन्य एक 19 वर्षीय आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात येणार आहे. या घटनेची पुढील कारवाई पोलीस करत आहे.

हेही वाचा-रुग्णालयातून महिला रुग्णाला केलं गायब; बाथरूममध्ये भलत्याच स्थितीत आढळला नराधम

पीडित मुलगी गडचिरोली तालुक्याच्या दक्षिणेतील एका आश्रमशाळेची विद्यार्थिनी आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे पीडित मुलगी देखील आपल्या घरीच होती. दरम्यान अलीकडेच पोळा झाल्यानंतर, संबंधित आश्रमशाळा पुन्हा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे पीडित मुलगी पुन्हा शाळेत गेली. शाळेत गेल्यानंतर प्रोटोकॉलनुसार सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान पीडित मुलगी दीड महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा-नराधमांकडून महिलेवर 15 वर्षे बलात्कार; अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसही हादरले

ही घटना उघडकीस येताच, शाळा प्रशासनात खळबळ उडाली होती. पण शाळा सुरू होऊन एक महिना झाला आणि पीडित मुलगी दीड महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आल्यानंतर, पीडितेवर शाळा सुरू होण्यापूर्वी अत्याचार झाल्याचं उघड झालं. यानंतर शाळा प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. धक्कादायक बाब म्हणजे आपण गरोदर असल्याची माहिती पीडित मुलीला देखील नव्हती. या घटनेची पोलिसांनी तपास केला असता, पीडित अल्पवयीन मुलीवर कोरोना काळात तिच्याच मामेभावाने आणि आत्येभावाने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

First published:

Tags: Gadchiroli, Rape on minor