Home /News /crime /

बापानेच केला अतिप्रसंग, संतापलेल्या मुलीने गळ्यावर पाय देऊन घेतला जीव

बापानेच केला अतिप्रसंग, संतापलेल्या मुलीने गळ्यावर पाय देऊन घेतला जीव

मंगळवारी संध्याकाळी मुलगी आपल्या चार महिन्याच्या बाळासह घरी एकटीच होती. मुलगी एकटीच असल्याचा फायदा घेत सुभाष बोराडेने तिची छेड काढली.

नाशिक, 15 जुलै : मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. चार महिन्याच्या बाळासह मुलगी घरी एकटी असताना सावत्र बापाने  छेड काढत अतिप्रसंग करत होता. त्यामुळे संतापलेल्या मुलीने बापाच्या गळ्यावर पाय देऊन खून केला. नाशिक रोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित आरोपी तरुणी स्वत: आपल्या पतीसह पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आणि वडिलांचा खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. सुभाष चिंतामण बोराडे असं खून झालेल्या पित्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीने आकाश शिंदे नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. लॉकडाउनच्या काळात हे जोडपे नाशिकमध्ये  चार महिन्यापूर्वी राहण्यासाठी आले होते. त्यादरम्यान, 26 मार्च रोजी त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला होता. त्यांना साडेचार महिन्यांचा मुलगा आहे. राज्यातले एकमेव पालिका रुग्णालय, जिथे कोरोनाबाधित बालमृत्यू दर आहे 'शून्य'! काही दिवसांपूर्वी आरोपी तरुणी आपल्या पती आणि मुलासह  खून झालेल्या सुभाष चिंतामण बोराडे यांच्या घरी राहण्यास आले होते. मंगळवारी संध्याकाळी मुलगी आपल्या चार महिन्याच्या बाळासह घरी एकटीच होती. त्यावेळी मृत सुभाष बोराडेने आपल्याच मुलीची छेड काढली आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने प्रतिकार केला. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत पित्याला दुखापत झाली आणि तो खाली कोसळला. त्यानंतर मुलीने बापाच्या गळ्यावर जोरात पाय दिला, त्यामुळे श्वास कोंडल्यामुळे जागेवरच मृत्यू झाला. डांबर घेऊन जाणाऱ्या टँकरला ओव्हरटेक,मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा VIDEO रागाच्या भरात वडिलांची हत्या झाल्यानंतर मुलीने आपला पती आकाश शिंदेला याची माहिती दिली. त्याने घरी धाव घेऊन धीर दिला. त्यानंतर दोघेही नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. आपणच वडिलांची हत्याची कबुली तिने पोलिसांना दिली. तिने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. न्यायालयात हजर केले असता तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: नाशिक, सावत्र बाप

पुढील बातम्या