Home /News /national /

कोरोनावर प्रभावी ठरलेल्या 'या' औषधाच्या 60 हजार बॉटल्स भारतात येणार, सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला

कोरोनावर प्रभावी ठरलेल्या 'या' औषधाच्या 60 हजार बॉटल्स भारतात येणार, सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला

महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण असल्याने सर्वात जास्त इंजेक्शन्स हे महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.

    नवी दिल्ली 15 जुलै: भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने औषधांचीही कमतरता भासत आहे. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या Remdesivirच्या औषधांची कमतरता असल्याने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. Remdesivir  भारतात Covifor औषधांच्या तब्बल 60,000 बॉटल्स निर्यात करणार आहे. त्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. 20 जुलैपर्यंत हे औषध भारतात येणार आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी या इंजेशनचा उपयोग केला जातो. जगभर त्याचे रिझल्टही चांगले आले असल्याचं आढळून आलं आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण असल्याने सर्वात जास्त इंजेक्शन्स हे महाराष्ट्राला मिळणार आहेत. राज्याला 12,500 बॉटल्स मिळणार आहेत. त्यानंतर दिल्लीला 10,000 आणि तेलंगणाला 9,000 Covifor इंजेक्शन्स मिळणार आहेत. अमेरिकेत हे औषध सर्वाधिक प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान,  अमेरिकन कंपनी मॉडर्ना (Moderna) कोरोनाव्हायरस लसने पहिली चाचणी यशस्वी पार केली आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले निकाल आले आहेत. या लसीने प्रत्येक व्यक्तीमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँटिबॉडिज तयार केली आहेत. हे वाचा - चीननंतर आता अमेरिकेतही सापडलं भयंकर ब्यूबॉनिक प्लेगचं एक प्रकरण मोडर्नाच्या लसविषयी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे या लसीचे कोणतेही साइड इफेक्ट दिसून आलेले नाही आहेत. एखाद्या लसीनं सुरुवातीच्या काळातच जर अँटिबॉडिज तयार केली तर त्याला मोठे यश मानले जाते, मात्र याचा अर्थ असा नाही की ही लस कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या पहिल्या चाचणीत अशा 45 लोकांचा समावेश होता जे निरोगी होते आणि त्यांचे वय 18 ते 55 दरम्यान होते.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या