काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. आपल्या खासगी अल्बममधून त्यांनी हे निवडक फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. त्याचबरोबर आपल्या मुलांसोबतचे निवांत क्षणही त्यांनी या फोटोच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणले आहेत.