Gold: तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आजपासून तुम्हाला गुंतवणुकीची मोठी संधी मिळणार आहे. जी तुमच्यासाठी सोन्याच्या इतर पर्यायांपेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण यामुळे गुंतवणूकदारांना दुप्पट फायदा होतो.
सध्याच्या बाजार दरांच्या सरासरीनुसार किमतीत डिस्काउंट दिलं जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची नवीन सीरीज, जी 6 मार्चपासून सबस्क्रिप्शनसाठी सुरु झाली आहे. तुम्हालाही या संधीचा फायदा घ्यायचा असेल, तर याविषयीच्या खास गोष्टी घ्या जाणून... सोनं खरेदी करताना राहा सावधान! सरकारने जारी केले नवे नियम
सबस्क्रिप्शनसाठी इश्यू प्राइस काय आहे? : रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन सीरीजसाठी सबस्क्रिप्शन 6 मार्चपासून सुरू झाली आहे. तुम्ही 10 मार्चपर्यंत बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. सेंट्रल बँकेने प्रति 10 ग्रॅम इश्यूची किंमत 5611 रुपये ठरवली आहे. जी मागील आठवड्यातील शेवटच्या 3 व्यापार सत्रातील सोन्याच्या दैनंदिन बंद किमतीच्या सरासरीवर ठरवली जाते. विशेष म्हणजे जे ग्राहक या सबस्क्रिप्शनसाठी ऑनलाइन अर्ज करतात त्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट दिली जाते. म्हणजेच त्यांना प्रति ग्रॅम फक्त 5561 रुपयेच मोजावे लागतील.
गोल्ड बाँड तुमच्यासाठी फायदेशीर सौदा आहे का? : तुम्हाला सोन्यात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल किंवा तुमच्या मुलांसाठी सोने जमा करायचे असेल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. काय सांगता! होळी खेळण्यासाठी मिळतेय सोन्या-चांदीची पिचकारी, किती आहे किंमत?