जाहिरात
मराठी बातम्या / मनी / काय सांगता! होळी खेळण्यासाठी मिळतेय सोन्या-चांदीची पिचकारी, किती आहे किंमत?

काय सांगता! होळी खेळण्यासाठी मिळतेय सोन्या-चांदीची पिचकारी, किती आहे किंमत?

सोन्याची पिचकारी आणि बकेट

सोन्याची पिचकारी आणि बकेट

लखनऊ येथे सार्वजनिक होळी खेळण्याची मोठी परंपरा आहे. त्यातच यंदा सोनं, चांदीच्या बादल्या आणि पिचकारी खरेदीचा कल वाढला आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 2 मार्च: होळी, धुलिवंदनच्या दिवशी तुम्ही सोन्या-चांदीची बादली आणि पिचकारी घेऊन कोणाला रंग खेळताना कधी पाहिलं आहे का? जर नसेल तर या वेळी लखनऊमध्ये तुम्हाला हे दृश्य दिसेल! नवाबांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनऊच्या रस्त्यावर यंदा सोन्या-चांदीच्या बादल्या आणि पिचकारी घेऊन होळी खेळताना तम्हाला लोक दिसू शकतात. कारण लखनऊमध्ये पहिल्यांदाच होळीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या बादल्या आणि पिचकाऱ्या शहरातील सराफा बाजार चौकात विक्रीसाठी आल्या आहेत. अर्थात त्याची किंमत ऐकून तुम्हालाही ती खरेदी करावी का नाही, असा प्रश्न पडू शकतो. कारण चांदीच्या पिचकारीची किंमत 2,000 ते 10,000 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत तुम्ही किती मोठी पिचकारी खरेदी करता यावर अवलंबून आहे. तर, चांदीच्या बादलीची किंमत 5,000 ते 30,000 रुपयांपर्यंत आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विक्रीसाठी आलेल्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या बादलीची किंमत तर लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे ही पिचकारी किंवा बादली तुम्ही एकदा घेतल्यानंतर तिचा वापर पुढील अनेक वर्षे होळी खेळण्यासाठी करू शकता. कारण ती खराब होण्याची शक्यता खूपच कमी आहे. दरम्यान, सराफा बाजारात अशा पिचकारी आणि बादली खरेदी करण्यासाठी लोकांची लगबग वाढली आहे. अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंगही केलं आहे.

    सोन्याच्या दागिन्यांवर मिळू शकतं 1 कोटी रुपये कर्ज, असं करा अप्लाय

    तर, मुलीच्या लग्नात देता येईल भेट

    लखनऊ येथे सार्वजनिक होळी खेळण्याची मोठी परंपरा आहे. त्यातच यंदा सोनं, चांदीच्या बादल्या आणि पिचकारी खरेदीचा कल वाढला आहे. याबाबत विनोद ज्वेलर्सच्या मालकांनी सांगितलं, ‘येथील लोक सोने, चांदीच्या बादल्या आणि पिचकारी रंग खेळण्यासाठी खरेदी करू शकतात. या सोबतच आई-वडिल त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर पहिल्या होळीला तिला ही बादली, पिचकारी भेट म्हणूनही देऊ शकतात. त्यासाठी बुकिंगही सुरू आहे.’ तर, सराफा चौक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदिश जैन यांनी सांगितल की, ‘या आधीही बाजारात चांदीची पिचकारी आणि बादल्या येत होत्या, मात्र या वेळी लोकांची मागणी जास्त आहे. लोकांना त्या खूप आवडत आहेत. या पिचकारी, बादलीचा वापर रंग खेळण्यासोबतच पालक त्यांच्या मुलीला तिच्या लग्नाच्या पहिल्या होळीला भेट म्हणूनही देतात.’

    64 वर्षांपूर्वी ‘एवढीच’ होती 10 ग्रॅम सोन्याची किंमत; बिल बघून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

    दरम्यान, होळी हा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. रंगांची उधळण करणारा हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज होऊ लागलेत. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी लोकांचीही लगबग वाढू लागली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात