16 जून 2021 पर्यंत हॉलमार्कचा वापर विक्रेत्यांच्या इच्छेवर अवलंबून होता. मात्र, हळूहळू ते अनिवार्य केले जाऊ लागले. आतापर्यंत 288 जिल्ह्यांमध्ये त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी सांगितले की सध्या 4 आणि 6 अंकी हॉल मार्क वापरले जातात.
मंत्रालयाचे म्हणणे आहे की, आता फक्त 6 अंकी हॉलमार्क वैध असेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, लोक 4 आणि 6 अंकांमुळे म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या हॉलमार्कमुळे गोंधळात पडले होते. हॉलमार्कच्या लेखन पद्धतीत आणखी एक बदल करण्यात आला आहे. पूर्वी अंक हॉलमार्किंग होते, जे अल्फान्यूमेरिक (अंक आणि अक्षरे असलेले) करण्यात आले आहेत. आता 4 अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद होणार आहे. Gold-Silver Rate Today in Nashik : वीकेंडला सोने खरेदीचा प्लॅन आहे? पाहा आजचा दर
HUID म्हणजे काय? : प्रत्येक दागिन्याची स्वतःची वेगळी ओळख असते. या क्रमांकाच्या मदतीने ग्राहकाला सोने आणि त्याच्या दागिन्यांशी संबंधित सर्व माहिती मिळेल. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता बरीच कमी होईल. ज्वेलर्सना ही माहिती BIS पोर्टलवर टाकावी लागेल. प्रत्येक ज्वेलरीवर मॅन्यूअली यूनिक नंबर लावला जाईल. काय सांगता! होळी खेळण्यासाठी मिळतेय सोन्या-चांदीची पिचकारी, किती आहे किंमत?