मुंबई : देशाचं बजेट नुकतंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. या बजेटमध्ये सीतारामन यांनी मध्यम- वर्ग, छोटे व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गीय लोक आणि शेतकऱ्यांच्या बकेटलिस्टचा विचार केला.
बजेट तयार करताना अनेक अडचणी आणि सगळ्या दृष्टीचा विचार करुन ते तयार होत असतं. ते खूप कठीण काम असलं तरी प्रत्येक बजेट हे तेवढंच आव्हानात्मक आणि वेगळा अनुभव देणारं होतं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.