आता AMC म्हणजे काय? तर अशा कंपन्या विविध गुंतवणूकदारांनी जमा केलेला निधी इक्विटी, बाँड, सोने इत्यादींमध्ये गुंतवतात. या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा फंड युनिट्सनुसार गुंतवणूकदारांमध्ये वितरीत करतात. एक चांगला फंड मॅनेजर फंडाची योग्य प्रकारे गुंतवणूक करुन त्यावर जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतो. ज्यामुळे गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळेल.
आता म्यूच्युअल फंड कसं काम करतं? तर म्युच्युअल फंडाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नसते. तुम्ही फक्त 500 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरु करु शकता. समजा तुम्हाला एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे, परंतु एका शेअरची किंमत 25,000 रुपये आहे. परंतु म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्ही अशा कंपन्यांमध्ये फक्त 500 रुपयांमध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंड सर्व गुंतवणूकदारांकडून 500-500 रुपये जमा करून त्या कंपनीमध्ये मोठी रक्कम गुंतवतो.
म्यूच्युअल फंडचा आणखी एक फायदा म्हणजे तुमचे पैसे वेगवेगळ्या सेक्टर आणि अॅसेटमध्ये गुंतवले जातात. समजा एखादं सेक्टर जसं की, बँकिंग किंवा ऑटो सेक्टरमध्ये एखाद्या कारणामुळे मंदी आली. तर याचा संपूर्ण पोर्टफोलियोवर जास्त फरक पडणार नाही. कारण या सेक्टरमध्ये थोडीशी गुंतवणूक होईल. ज्यामुळे संपूर्ण पोर्टफोलियावर काही खास प्रभाव पडणार नाही.