मुंबई, 6 मार्च: होम लोन घ्यायला अनेक लोक घाबरतात. कर्ज घेऊन घर घेणं योग्य नाही असं त्यांना वाटतं. म्हणूनच ते दुसरीकडे गुंतवणूक करतात. अनेक फायनेंशियल प्लानर होम लोन घेऊन घर खरेदी करतात आणि रिकरिंग इन्वेस्टमेंट किंवा SIP च्या जागेवर EMI भरण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, तर घर खरेदी करणे, विशेषत: कर्जावर घर खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. आयकर कायद्यांतर्गत होम लोन घेण्याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत. तसेच यावर डबल टॅक्स बचत कशी करता येईल याविषयी देखील आपण जाणून घेऊया. घर खरेदी करणे, विशेषत: पहिले घर, हा गुंतवणुकीपेक्षा भावनिक निर्णय असतो. प्रत्येकजण स्वतःच्या राहण्यासाठी पहिले घर खरेदी करतो. कारण स्वतःचे घर अनेक प्रकारे मनःशांती देते, जे भाड्याच्या घरात शक्य नसते. इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, अशा परिस्थितीतही घर खरेदी करणे फायदेशीर आहे. किरायाच्या स्थितीत केवळ एचआरएवर क्लेम केले जाऊ शकते. तर कर्ज घेऊन घर खरेदी करताना अनेक सवलतींवर क्लेम करण्याची संधी आहे.
Aadhaar Card हरवलंय? चुकीचा वापर होऊ नये म्हणून असं करा लॉकया डिडक्शंसवर करु शकता क्लेम
आयकर कायद्यांतर्गत, होम लोनच्या प्रिंसिपल अमाउंटच्या रिपेमेंटवर कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे डिडक्शन घेतले जाऊ शकते. तर कलम 24(b) अंतर्गत, गृहकर्जाच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंतच्या डिडक्शन क्लेम केले जाऊ शकते. कर्ज घेणारा व्यक्ती हे दोन्ही एकत्र करून एका आर्थिक वर्षात 3.5 लाख रुपयांपर्यंत कर बचतीचा दावा करू शकतो.
UPI वरुन किती पैसे पाठवता येतात? SBI, HDFC सह प्रमुख बँकांची लिमिट काय?जॉइंट लोन घेतल्यावर मिळेल डबल फायदा
तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉइंट लोन घेतल्यास, तुम्ही दोघेही स्वतंत्रपणे या बेनिफिट्सला क्लेम करू शकता. या प्रकरणात, कम्बाइन लिमिट सेक्शन 80C अंतर्गत 3 लाख रुपये आणि सेक्शन 24 (b) अंतर्गत 4 लाख रुपये असेल. म्हणजेच एकूण 7 लाख रुपयांचे डिडक्शन मिळेल. हे एक असं पाऊल आहे. जे तुमच्या होम लोनला एसेट क्रिएशन टूलसह टॅक्स सेविंग एवेन्यू बनवू शकते.
या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं
टॅक्स बेनिफिटचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. होम लोनचा को-बॉरोअर देखील खरेदी केलेल्या मालमत्तेचा को-ओनर असावा. असे न झाल्यास त्याला कर सवलती मिळू शकत नाहीत. अशा प्रकरणांमध्ये, EMI भरण्यात भागीदार असूनही, त्याला कर लाभ मिळू शकणार नाही.