टर्म इन्शुरन्स हा सामान्य लाइफ इन्शुरन्सचा एक भाग आहे. विमाधारकाचा मृत्यू झाल्यावरच या इन्शुरन्सचे संरक्षण मिळते. या प्रकरणात, नॉमिनीला विम्याची संपूर्ण रक्कम मिळते.
जर तुम्हीही टर्म इन्शुरन्स घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याविषयी जाणून घेऊया.
तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षापासून ते 65 वर्षांपर्यंत मुदतीचा इन्शुरन्स घेऊ शकता. परंतु सामान्यतः तज्ञ लोकांना 20 ते 25 वर्षे वयाचा टर्म इन्शुरन्स घेण्याचा सल्ला देतात आणि पॉलिसीची मुदत जास्त ठेवण्यास सांगतात. उन्हाळ्यात AC मुळे जास्त वीजबिल येतंय? या 5 ट्रिक येतील कामी
टर्म इन्शुरन्स खरेदी करताना, हे लक्षात ठेवा की, तो तुमच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यास सक्षम असावा. तज्ज्ञांच्या मते, टर्म इन्शुरन्समध्ये किमान 9 ते 10 पट परतावा नक्कीच दिला पाहिजे. LIC ची 'ही' योजना आहे बेस्ट! रोजच्या 256 रुपयांच्या गुंतवणुकीने तुम्ही व्हाल मालामाल
टर्म इन्शुरन्स घेताना, जर तुम्ही तुमच्या आजाराबद्दल योग्य माहिती देत नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. नंतर अशा लोकांना क्लेम मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
टर्म इन्शुरन्स निवडताना तुम्ही ज्या कंपनीकडून विमा खरेदी करत आहात त्या कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे हे तपासा. कमी क्लेम सेटलमेंट रेशो असलेल्या कंपनीकडून टर्म इन्शुरन्स घेणे टाळा. HDFC ने सुरु केला लाइफ इन्कम इन्शुरन्स प्लॅन, रिटर्नसोबत मिळेल टॅक्स बेनिफट