नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी: एचडीएफसी या बँकिंग आणि फायनेंशियल सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीने एचडीएफसी लाइफ गॅरंटीड इन्कम इन्शुरन्स प्लॅन सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा प्लॅन गॅरंटीड, नियमित, टॅक्स फ्री बेनिफिट्स लाभ आणि गॅरंटीड डेथ बेनिफिट प्रदान करते. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या मदतीने, कंपनी लोकांना एक आर्थिक निधी तयार करण्याची संधी देत आहे. जी त्यांना नियमित आणि गॅरंटीड इन्कमच्या माध्यमातून त्यांची मदत करेल.
HDFC लाइफ गॅरंटीड इन्कम इन्शुरन्स प्लॅन काय?
एचडीएफसी लाइफ गॅरंटीड इनकम इन्शुरन्स प्लॅन ही एक नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटेड इंडिविजुअल लाइफ इंन्शुरन्स सेविंग प्लान आहे. नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग विमा पॉलिसी कंपनीच्या व्यवसायात भाग घेत नाहीत. तुम्हाला विम्याच्या रकमेवर आधारित निश्चित प्रीमियम भरावा लागेल आणि गॅरंटीड रिटर्न मिळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्लॅन प्रीमियम भरण्याची मुदत पूर्ण केल्यानंतर गॅरंटीड टॅक्स फ्री लाभ प्रदान करते आणि संपूर्ण पॉलिसी अवधी दरम्यान गॅरंटीड डेथ बेनिफिट्सही मिळतात.
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत लवकर वाढेल पैसा! मिळेल 50 लाखांच्या सम एश्योर्डसह लोनची सुविधाकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्लॅनचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत-
-या प्लान पॉलिसी अंतर्गत ‘सम अॅश्युअर्ड’ च्या टक्केवारीच्या रूपात दरवर्षी 11% ते 13% गॅरंटीड उत्पन्न देते. -हा एक नॉन-पार्टिसिपेटिंग लाइफ इंश्युरन्स प्लान आहे. -ऑनलाइन खरेदीसाठी पहिल्या वर्षाच्या प्रीमियमवर सूट उपलब्ध आहे. प्रीमियम पेइंग टर्म (PPT) वर्ष 8 आणि 10 साठी 12% ची सूट उपलब्ध आहे. आणि 12 आणि 15 वर्षांच्या PPT साठी 15% सूट उपलब्ध आहे. -हा प्लान उत्पन्नाच्या भरणा टप्प्यात जीवन संरक्षण देखील प्रदान करते. -व्यक्ती 8, 10, 12, 15, 20, 25 किंवा 30 वर्षांचा उत्पन्न कालावधी निवडू शकतात. -कौटुंबिक उत्पन्न लाभ पर्याय म्हणून गॅरंटीड डेथ बेनिफिट एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमध्ये मिळू शकते.
एचडीएफसी लाइफ प्रोडक्ट्स अँड सेगमेंटचे प्रमुख अनिश खन्ना म्हणाले की, योजना जीवन विमा संरक्षण आणि दीर्घकालीन बचतीचे दुहेरी फायदे देते. एचडीएफसी लाइफ गॅरंटीड इनकम इन्शुरन्स प्लॅन गॅरंटीड रिटर्न देते आणि पॉलिसीधारकांचे भविष्यातील अनिश्चिततेपासून संरक्षण करते. प्लॅनमध्ये योजना उत्पन्न भरणा टप्प्यात देखील प्रीमियम भरण्याची टर्म आणि लाइफ कव्हरचा पर्याय मिळू शकतो. आम्ही आशा करतो की, लोक या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेतील.