यूकेची बँक HSBC आता सिलिकॉन व्हॅली बँक विकत घेणार आहे. HSBC ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ते SVB चे UK युनिट खरेदी करेल. विद्यमान स्त्रोताकडून संपादनासाठी रक्कम अदा करेल. शुक्रवारी कॅलिफोर्नियातील रेगुलेटर्सने सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) बंद केली आणि तिचे नियंत्रण यूएस फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) कडे सोपवले.
HSBC सिलिकॉन व्हॅली बँकेचे यूके युनिट खरेदी करेल. सिलिकॉन व्हॅली बँक यूके युनिटवर सुमारे 550 दशलक्ष पौंड कर्ज आहे. यावर यूकेचे ट्रेझरी सेक्रेटरी सांगतात की, हा संपूर्ण व्यवहार बँक ऑफ इंग्लंडच्या देखरेखीखाली होईल. QR Code ने पेमेंट करताय? जरा थांबा, 'या' चुका पडू शकतात महागात
अमेरिकेत आणखी एक बँक बंद पडली : सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर आता अमेरिकेच्या रेगुलेटर्सने आणखी एक बँक बंद केली आहे. बँकिंग संकट पसरण्यापासून रोखण्यासाठी, यूएस रेगुलेटर्सने रविवारी न्यूयॉर्क स्थित क्रिप्टो इंडस्ट्रीतील एक मोठी लेंडर सिग्नेचर बँक बंद केली. Paytm वरुन क्रेडिट कार्ड बिल तुम्हाला भरता येतं का? ही आहे सोपी प्रोसेस
बँकिंग रेगुलेटर्सने सांगितले की, ठेवीदार त्यांना पाहिजे तेव्हा सिग्नेचर बँकेत जमा केलेली रक्कम काढू शकतात. रेगुलेटर्सने सिलिकॉन व्हॅली बँकेच्या ठेवीदारांनाही असाच पर्याय दिला आहे. रेगुलेटर्सने सांगितले की, सिलिकॉन व्हॅली बँकेप्रमाणे सिग्नेचर बँकेच्या सर्व ठेवीदारांकडे पूर्ण नियंत्रण असेल. टैक्सपेयर्सचं कोणतंही नुकसान होणार नाही. LIC च्या या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली का? सात पट मिळताय रिटर्न