सरकारी आणि प्रायव्हेट बँकांद्वारे चालवल्या जाणार्या विशेष FD स्किम्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी तुमच्याकडे आता फक्त काही दिवस उरले आहेत. म्हणूनच, जर तुम्हाला उत्कृष्ट परतावा देणाऱ्या या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर अजिबात उशीर करु नका. एका क्रेडिट कार्डचं बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने कसं भरावं, या आहेत सोप्या ट्रिक
IDBI बँकेची नमन सीनियर सिडीझन डिपॉझिट स्किमही 31 मार्च रोजी संपतेय. यामध्ये एक वर्ष ते दहा वर्षांपर्यंत पैसे जमा करता येतील, 1 पेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7.50 टक्के आणि 3 ते 5 वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज दिले जाईल. यासाठी किमान 10,000 रुपये गुंतवावे लागतील. कार लोन घ्यायचा विचार करताय? 'या' बँक ऑफर करताय सर्वात स्वस्त लोन
इंडियन बँकेने 'इंड शक्ती 555 डेज' नावाची एक विशेष रिटेल एफडी लॉन्च केली आहे. ज्यामध्ये 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करता येईल. यामध्ये 555 दिवसांसाठी 5000 रुपयांपासून 2 कोटींपर्यंत गुंतवणूक करता येईल. यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज देण्यात येत आहे. PPF अकाउंट बंद झालंय तर नो टेंशन! एका झटक्यात करता येईल सुरु, ही आहे प्रोसेस
स्टेट बँक ऑफ इंडियाने 15 फेब्रुवारी 2023 रोजी 'अमृत कलश' नावाने 400 दिवसांसाठी FD लाँच केली होती. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के तर सर्वसामान्यांना 7.10 टक्के व्याज देण्यात येतेय. तुम्ही या FD मध्ये 31 मार्च 2023 पर्यंत पैसे गुंतवू शकता. सहकारी बँका FD वर देताय 9 टक्के व्याज, पण धोके माहितीये का?