Control Blood Sugar : ब्लड शुगर कायम राहील नियंत्रित, फक्त रात्री करा हे काम
मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील सर्व बाबतीत जास्त काळजी घ्यावी लागते. त्यांचा आहार, झोप याकडे खूप लक्ष द्यावे लागते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रात्री काय काळजी तुमची शुगर नियंत्रित राहू शकते.
मधुमेहाच्या रुग्णांनी रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी, चॉकलेट आणि सोडा यासारखे कॅफिनयुक्त पदार्थखाऊ नये. कारण यामुळे तुम्हाला शांत झोप लागत नाही. यासोबतच अल्कोहोलदेखील तुमच्या झोपेवर वाईट परिणाम करते.
2/ 6
झोपण्यापूर्वी थोडा व्यायाम किंवा थोडी शारीरिक हालचाल केल्याने फायदा होतो. झोपण्यापूर्वी किंवा रात्रीच्या जेवणानंतर थोडे चालल्याने साखरेची पातळी रात्रभर स्थिर राहण्यास मदत होते.
3/ 6
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे रोज 6 ते 8 तासांची झोप पूर्ण करणे आवश्यक आहे.
4/ 6
मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार भूक लागू शकते, विशेषत: रात्री. मात्र अशावेळी भूक लागलेली असताना जंक फूड, चिप्स, खारट, गोड इत्यादी पदार्थ खाणे टाळा. हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
5/ 6
रात्री शक्यतो हलके अन्न खा. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. रात्री जड पदार्थ खाणे टाळा आणि रात्रीचे जेवण लवकर करण्याचा प्रयत्न करा. तसेच झोपण्यापूर्वी एक तास आधी फोन, लॅपटॉप आणि टीव्हीपासून दूर राहा.
6/ 6
आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे.