प्रेमात पडलेल्या लोकांमध्ये दिसत असलेल्या काही लक्षणांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. त्यावरून एखादी व्यक्ती प्रेमात पडलीय का हे ओळखता येऊ शकतं प्रेमाच्या बाबतीत सर्वांत जास्त चित्रपटांत दर्शवलं गेलं आहे आणि साहित्यात लिहिलं गेलं आहे. अर्थात, तरीही विज्ञानानेही त्याची व्याख्या केली आहे. शास्त्रज्ञांनी केवळ प्रेमात पडण्याच्या स्थितीचीच नव्हे, तर त्याच्या लक्षणांचीही व्याख्या केली आहे. ही लक्षणं पहिल्या प्रेमाच्या वेळी दिसतात. त्यावरून लक्षात येतं, की संबंधित व्यक्ती प्रेमात पडली आहे. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की दुसऱ्याबद्दल केवळ (शारीरिक) आकर्षण (Lust) वाटत असलेल्या व्यक्ती आणि दीर्घ काळ नातेसंबंधांत (Committed) असलेल्या व्यक्तींपेक्षा प्रेमात पडलेल्या व्यक्ती वेगळ्या असतात. (संग्रहित फोटो : shutterstock)
रटगज विद्यापीठातल्या मानववंशशास्त्रज्ञ डॉ. हेलन फिशर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे, की प्रेमात असताना मेंदू (Brain) त्या ठराविक कालावधीत एका विशेष अवस्थेत असतो. व्यक्ती त्या अवस्थेत आहे, हे काही लक्षणांवरून समजतं. लाइव्ह सायन्सच्या वृत्तानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात (Being in Love) असते, तेव्हा त्या व्यक्तीला आपला प्रियकर किंवा प्रेयसी सगळ्यांपेक्षा वेगळा/वेगळी आहे, असं वाटू लागतं. त्याचबरोबर त्या व्यक्तीला त्या वेळेला दुसऱ्या कोणाबद्दल प्रेमभाव वाटत नाही. त्यादरम्यान, त्या व्यक्तीच्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्रवत असतं.(संग्रहित फोटो : shutterstock)
प्रेमात पडलेल्या व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करत असतात, त्या व्यक्तीच्या केवळ सकारात्मक बाजूंवरच लक्ष देतात. त्या व्यक्तींच्या नकारात्मक बाजूंकडे ते पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं. प्रेमात पडलेलं असताना या व्यक्ती दिवास्वप्न पाहत असल्याप्रमाणे वागतात. डोपामाइन आणि नोरीपाइनफ्राइन या हॉर्मोन्सच्या (Hormones) पातळीत वाढ होत जाते.(संग्रहित फोटो : shutterstock)
प्रेमात पडलेली व्यक्ती भावनात्मक आणि शारीरिकदृष्ट्या अस्थिर अवस्थेतून जात असते. त्या वेळी अतिउत्साह, अतिप्रसन्नता, वाढलेली ऊर्जा, झोप न येणं, भूक न लागणं, हृदयाची धडधड वाढणं, श्वासोच्छ्वास वेगाने होणं, घबराट अशी लक्षणं दिसतात. नातेसंबंधांत अगदी पुसटसा दुरावा आला, तरी या व्यक्ती गंभीररीत्या निराश होतात. एखाद्या नशेखोर व्यक्तीसारखी लक्षणं त्यांच्यात दिसतात. (संग्रहित फोटो : shutterstock)
प्रेमात पडलेल्या व्यक्तींमध्ये रोमँटिक आकर्षणात वाढ होत जाते. त्यासाठी डोपामाइन (Dopamine) हे रसायन कारणीभूत असतं. डोपामाइन मेंदूच्या मध्यात असे न्यूरॉन तयार करतो, की ज्यातून त्याची जास्त निर्मिती होते. ज्याच्या प्रेमात पडलो आहोत, त्या व्यक्तीबद्दल संबंधित व्यक्ती जास्तच विचार करू लागते. त्यांच्यामध्ये ऑब्सेशन येतं. मेंदूत सरोटोनिनची पातळी कमी झाल्यामुळे असं घडतं.प्रेमात असताना लोक भावनाप्रधान असतात. त्यात असूया/मत्सर, नाकारलं जाण्याची भीती, वेगळं होण्याच्या कल्पनेनं येणारी बेचैनी आदींचा समावेश असतो. एखादं व्यसन असलेल्या व्यक्तींना व्यसन करायला मिळालं नाही तर त्यांच्या मेंदूचे जे भाग सक्रिय होतात, तेच भाग अशा स्थितीत प्रेमात पडलेल्यांच्या मेंदूत सक्रिय होतात. प्रेमिकासोबत भावनात्मक बंध जुळण्याची भावना मनात घट्ट होते. त्याच्या सहवासात असल्याची स्वप्नंही पाहिली जातात. (संग्रहित फोटो : shutterstock)
प्रेमात पडलेल्या व्यक्तीला सहवेदनेची (Empathy) शक्तिशाली भावना दिसते. एकमेकांच्या वेदना समजून घेण्याची, दुसऱ्यासाठी त्याग करण्याची वृत्ती वाढीला लागते. प्रेमात पडलेल्या व्यक्ती प्रेमिकाला अनुकूल अशा रीतीने वागण्यात, मूल्यांत बदल करतात. प्रेमिकासोबत सेक्स करण्याची इच्छा असतेच; मात्र त्यापेक्षा भावनिक जवळीक महत्त्वाची वाटते. प्रेमाचा आवेग अनियंत्रित असतो आणि स्वतःचं नियंत्रण सुटत चाललं असल्याचं त्यांना वाटतं.(संग्रहित फोटो : shutterstock)