काळी हळद ही एक दुर्मिळ औषधी वनस्पती आहे. यामध्ये कर्क्यूमिनचे प्रमाण सर्वाधिक असते. आणि हे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी एजंट देखील आहे. काळी हळद अनेक आरोग्यदायी फायदे देते.
वेदना कमी करते : काळी हळद एक उत्तम वेदनाशामक म्हणून ओळखली जाते. काळ्या हळदीचा उपयोग दातदुखी, पुरळ, पोटाच्या समस्या आणि ऑस्टियोआर्थरायटिससाठी केला जातो. परंतु याचे सेवन नेहमी प्रमाणात करावे.
शुगर नियंत्रित करते : काळी हळद रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. हे शरीरात पित्त उत्पादन राखते आणि योग्य पचन करण्यास मदत करते. यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होण्याचा धोका कमी होतो.
अँटिऑक्सिडंट : काळी हळददेखील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे, जी आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे.
फुफ्फुसाचा विकार : काळ्या हळदीमध्ये असलेले कर्क्युमा सेसिया फुफ्फुसांना मजबूत करते आणि ब्राँकायटिस, न्यूमोनिया, दमा इत्यादी रोग बरे करते.
जखमा लवकर बऱ्या करते : झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ काप, दुखापती झालेल्या भागावर काळ्या हळदीची पेस्ट लावल्यास जखमा लवकर बऱ्या होतात.
पचन चांगले होते : काळी हळद पोटाच्या समस्या, पचन सुधारण्याचे काम करते. जर कोणाला पोटदुखी किंवा गॅसची समस्या असेल तर यासाठी काळी हळद पावडर तयार करून पाण्यात मिसळून प्या.
त्वचेसाठी फायदेशीर : पिवळ्या हळदीप्रमाणेच काळी हळदही त्वचेसाठी फायदेशीर आहे. या हळदीमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास ग्लो येतो, काळे डाग आणि पिंपल्सपासूनही तुम्हाला सुटका मिळेल.
सांधेदुखीत आराम : वाढत्या वयाबरोबर सांधेदुखी होणे सामान्य आहे. वेदना वाढू लागल्यावर अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध काळ्या हळदीची पेस्ट प्रभावित भागात लावा, सूजमध्येही आराम मिळेल.