उत्तम अभिनेत्री आणि कवयित्री असलेल्या प्राजक्तानं नुकतंच उद्योगक्षेत्रात पाऊल टाकलं आहे. तिने 'प्राजक्तराज' नावाचा दागिन्यांचा ब्रँड स्थापन केला आहे.
अस्सल मराठमोळे, पारंपरिक दागिन्यांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्राजक्तानं हे पाऊल उचललं आहे. तिचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे.
प्राजक्ता माळी अलीकडेच विदर्भातील प्रसिद्ध ब्रम्हपुरी महोत्सवला गेली होappreciatesती. तिथे बॉलिवूड स्टार सोनू सूद यांनी देखील हजेरी लावली होती.
या महोत्सवाबद्दल प्राजक्ताने एक खास पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिनं म्हटलंय कि, 'महोत्सवात “प्राजक्तराज” विषयी महोत्सवाइतकं बोललं गेलं; की मी भारावून गेले… खूप आभार…'