अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नव्या वर्षात प्राजक्तराज हा तिचा नवा दागिन्यांचा ब्रँड लाँच केला आहे. ब्रँडच्या नावानं सर्वाचं लक्ष वेधलंय. राज ठाकरेंनी ब्रँडचं उद्धाटन केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि प्रसिद्ध कांदबरीकार विश्वास पाटील यांच्या उपस्थित 'प्राजक्तराज' या ब्रँडचं ओपनिंग करण्यात आलं.
प्राजक्ताने मराठी संस्कृती वाचवण्यासाठी उचलेल्या या पाऊलाच सगळीकडे कौतुक होत आहे. पण प्राजक्ताला मात्र एका गोष्टीची खंत आहे.
प्राजक्तानं आज त्यामागचा उलगडा केला आहे. प्राजक्ताने महाराष्ट्राच्या पुरुषप्रधान संस्कृतीवर मत व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्रातील पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांच्या दागिन्यांवर एवढं संशोधन झालंच नाही. कोणी त्या विषयाला आजपर्यंत पाहिजे तेवढं महत्व दिलं नाही. अशी खंत प्राजक्ताने व्यक्त केली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता आता उद्योजिका म्हणून नवं काम सुरू करत आहे. तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.