अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नव्या वर्षात प्राजक्तराज हा तिचा नवा दागिन्यांचा ब्रँड लाँच केला आहे. ब्रँडच्या नावानं सर्वाचं लक्ष वेधलंय. राज ठाकरेंनी ब्रँडचं उद्धाटन केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि प्रसिद्ध कांदबरीकार विश्वास पाटील यांच्या उपस्थित 'प्राजक्तराज' या ब्रँडचं ओपनिंग करण्यात आलं.
खरतर सगळ्यांनी प्राजक्ताच्या या ब्रॅण्डचं नाव 'प्राजक्तसाज' असं सुचवलं होतं. पण हे नाव न निवडता तिने प्राजक्तराज हे नाव निवडलं.
यामागचं कारण सांगताना ती म्हणाली, 'प्राजक्तसाज' हे नाव छान आहे पण ते थेट लक्षात आलं असतं कि हा एखाद्या दागिन्यांच्या ब्रँड बद्दलच असेल. म्हणून हे नाव ठेवलं नाही.
तर प्राजक्तराज नाव ठेवण्यामागचं कारण सांगत ती म्हणाली, 'राज या शब्दात एक वजन आहे, भारदस्तपणा हा शब्द उच्चरताच भारी वाटतं.'
ती पुढे म्हणाली, 'कुठल्याही शब्दाला राज शब्द जोडला कि त्याचं वजन वाढतं. उदा, आपण एखादा खूप देखणा असेल तर त्याला राजबिंडा असं म्हणतो.'
'माझ्या दागिन्यांचंही तसंच आहे. म्हणून मी प्राजक्त राज हे नाव निवडलं.' असं प्राजक्ताने सांगितलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता आता उद्योजिका म्हणून नवं काम सुरू करत आहे. तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.