किशोर कुमार यांनी चार लग्न केली. त्यांच्या चारही बायका अभिनेत्री होत्या. रुमा गुहा ठाकुरता, मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंदावरकर या किशोर कुमार यांच्या चार बायका होत्या.
किशोर कुमार यांनी 1950मध्ये रुमा गुहा ठाकुरता यांच्याशी पहिलं लग्न केलं. 1952मध्ये त्यांना एक मुलगा झाला. सध्या म्युझिक इंडस्ट्रीमधील अमित कुमार हे किशोर कुमार यांचे पुत्र आहे.
रुमा यांनी घर सांभाळावं असं किशोर यांचं म्हणणं होत. परंतू रुमा यांना अभिनयात करिअर करायचं होतं. 8 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला.
तेव्हाची सगळ्यात आघाडीची अभिनेत्री मधुबाला किशोर कुमार यांची दुसरी पत्नी होती. 1960मध्ये दोघांनी विवाह केला. किशोर यांनी मधुबाला यांच्याशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला होता. त्यामुळे त्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती.
मधुबाला यांच्या हृदयाला छिद्र होतं. त्यामुळे त्या आजारी होत्या. किशोर कुमार यांनी 9 वर्ष मधुबाला यांचा संभाळ केला. 1965मध्ये मधुबाला यांचं निधन झालं आणि किशोर कुमार एकटे पडले.
मधुबाला यांच्या निधनानंतर एकटे पडलेल्या किशोर कुमार यांना योगिता बाली यांनी आधार दिला. 70 -80च्या दशकात योगिता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती. 1976साली त्यांनी लग्न केलं. परंतू किशोर यांचं तिसरी लग्नही टिकू शकलं नाही ते 1978मध्ये वेगळे झाले.
त्यानंतर किशोर कुमार यांनी 1980साली अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्या प्रेमात पडले. 1980मध्ये दोघांनी लग्न केलं. लीना किशोर कुमार यांच्यासाठी गाणी लिहायच्या. लीना या किशोर कुमार यांच्याबरोबर शेवटपर्यंत होत्या.
किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929साली झाला तर 13 ऑक्टोबर 1987साली त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्या अनेक सिनेमातील गाणी किशोर कुमार यांनी गायली आहेत. भारतीय सिनेसृष्टीतही किशोर कुमार यांचा मोलाचं योगदान आहे.