अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या टीव्ही सिनेमांपासून दूर आहे पण ती सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रिय आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलेला असतानाही हंसिका मात्र तिचं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
हंसिका सध्या मालदिवमध्ये असून तिनं तिच्या सोशल मीडिया मीडिया अकाउंटवर या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
हंसिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील एका फोटोमध्ये ती समुद्र किनाऱ्यावर सनबाथ घेताना दिसत आहे.
समुद्र किनाऱ्यावर योगा करतानाचा हा यलो मोनोकिनीमधील फोटो शेअर करताना हंसिकानं लिहिलं, ‘स्वतःच्या चांगल्या भविष्याकडे पाहताना.’
हंसिकानं तिच्या सोशल मीडियावर या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
या ब्लॅक ड्रेसमधील फोटोमध्ये हंसिका खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोला 2 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.