80 च्या दशकातील अभिनेत्री रेखा हिची आजही सगळीकडे चर्चा होते. आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवलं.
उत्तम अभिनेत्रीबरोबर रेखा उत्तम डान्सर आहेत. नटण्या सजण्याची प्रचंड आवड असलेल्या रेखा आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालतात.
रेखा यांचा जन्म 102 ऑक्टोबर 1954साली झाला. जन्मापासूनच दिसायला सुंदर असलेल्या रेखा यांना आजही नॅचरल ब्युटी म्हणतात.
70च्या दशकात रेखा-अमिताभ एकीकडे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असायचे. तर दुसरीकडे, त्यांच्या प्रेम आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चा झाल्या.
1990 साली रेखा यांचं लग्न मुकेश अग्रवाल यांच्याशी झालं पण वर्षभरात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा पासून त्या सिंगल आहेत.
आजवर अभिनेत्री रेखा याच नावानं प्रसिद्ध झाली. पण तिचं खरं नाव रेखा नाहीये असं म्हटलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
अभिनेत्री रेखाचं खरं नाव भानुरेखा असं आहे. ती केवळ रेखा असंच नाव लावते. तर तिचं आडनाव गणेशन असं. भानुरेखा गणेशन असं रेखाचं पूर्ण नाव आहे.