जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / भुसावळ पुन्हा हादरलं! 20 वर्षाच्या तरुणाची सपासप वार करून निर्घृण हत्या

भुसावळ पुन्हा हादरलं! 20 वर्षाच्या तरुणाची सपासप वार करून निर्घृण हत्या

भुसावळ पुन्हा हादरलं! 20 वर्षाच्या तरुणाची सपासप वार करून निर्घृण हत्या

निर्घृण हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा भुसावळ शहर हादरलं

  • -MIN READ
  • Last Updated :

भुसावळ, 14 सप्टेंबर: निर्घृण हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा भुसावळ शहर हादरलं आहे. शहरातील खडका चौफुलीवर शेख अल्तमश शेख रशीद (वय-20, रा. बाबला हॉटेल, कमलाबाई बिल्डींग) या तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूनं सपासप वार करून हत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री साडे 10 वाजेच्या सुमारास घडली. **हेही वाचा…** प्रेमीयुगुलाचा भयानक अंत! जन्मदात्यानं उद्ध्वस्त केला लेकी लेकीचा संसार मिळालेली माहिती अशी की, अल्तमश शेख हा तरुण खडका रोडवरील एका पुलाजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळसा. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मारेकऱ्यांनी अल्तमश शेखच्या छातीवर धारदार चाकूने सपासप वार केले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब ठोंबे, सपोनि अनिल मोरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपथक दाखल झाले. अल्तमशवर हल्ला नेमका कुणी केला? हे अद्याप समजू शकले नाही. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णावयात पोलिस बंदोबस्त… या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अल्तमश याला डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये तातडीनं आणण्यात आलं होत. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. त्यानंतर हॉस्पिटल परिसरात मृताचे नातेवाईक व मित्र मंडळींनी मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी आरसीपी पथकाला या ठिकाणी तैनात केले होत. काही विपरीत घटना घडू नये, यासाठी हॉस्पिटल परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी घरात घुसून एका तरुणावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. शहरात वारंवार हत्येच्या घटना घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरात घुसून चाकूनं केले सपासप वार, नंतर झाडली गोळी भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागात एका तरुणाची गेल्या महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. विलास दिनकर चौधरी ( वय-38) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. विलास दिनकर चौधरी या तरुणावर चाकू हल्ला आणि गोळीबार झाला असून त्यातच त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा… कॉलेज युवकाची निर्घृण हत्या करून झुडपात फेकला मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण विलास चौधरी घराबाहेर फोनवर बोलत असताना काळे कपडे घालून आलेल्या तीन ते चार तरुणांनी त्याच्या हात आणि पोटावर चाकूनं सपासप वार केले. यावेळी विलास चौधरी घरात पळला. त्यानं घराचा दरवाजा आतून बंद केला. मात्र, या हल्लेखोरांनी पुन्हा घराकडे येऊन दरवाज्यावर दगडफेक करून घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला. हल्लेखोरांनी विलासवर गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली आणि ते पसार झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: jalgaon
  • First Published :
जाहिरात
जाहिरात