प्रेमीयुगुलाचा भयानक अंत! खोट्या प्रतिष्ठेमुळे जन्मदात्यानं उद्ध्वस्त केला लेकीचा संसार

प्रेमीयुगुलाचा भयानक अंत! खोट्या प्रतिष्ठेमुळे जन्मदात्यानं उद्ध्वस्त केला लेकीचा संसार

रिंकीने दोन वर्षांपूर्वी आपल्या बालपणीचा मित्र मनीष लोधी याच्याशी प्रेमविवाह केला होता.

  • Share this:

कानपूर, 13 सप्टेंबर: मुलीनं प्रेमविवाह केला.. लोक काय म्हणतील.. आता समाजात तोंड काढायला जागा ठेवली नाही.. आपली बदनामी होईल, अशा खोट्या प्रतिष्ठेमुळे जन्मदात्या बापानंच आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी पतीचा निर्घृण हत्या केल्यानंतर मुलीनं आत्महत्या केली. विशेष म्हणजे मुलगी पोलिस कॉन्स्टेबल होती. उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथी ही घटना घडली आहे.

हेही वाचा...'देव तारी त्याला कोण मारी', 3 मुलांसह महिलेकडून पाण्यात कोसळली कार आणि...

मिळालेली माहिती अशी की, पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या मुलीच्या डोळ्यांसमोरच 15 दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी पतीची चाकूने भोसकून हत्या केली होती पतीच्या हत्येनंतर दुःखी झालेल्या तरुणीनं देखील आत्महत्या करून आपला जीवनप्रवास संपवला. धक्कादायक म्हणजे महिलेला पाच महिन्यांचा मुलगा आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फतेहपूरच्या कल्याणपूर पोलिसांनी सांगितलं की, गौसपूर गावातील रिंकी राजपूत (वय-25) उत्तर प्रदेश पोलीस दलात शिपाई म्हणून 2018 मध्ये रुजू झाली होती. रिंकी ही जालौन येथे तैनात होती. रिंकीने दोन वर्षांपूर्वी आपल्या बालपणीचा मित्र मनीष लोधी याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, या विवाहाला रिंकीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यानंतर रिंकी आणि मनीष यांना मुलगा झाला. हे छोटसं कुटुंब जालौनच्या शिवपूर परिसरात राहात होते.

मुलीनं प्रेमविवाह केला म्हणून रिंकीचे आई-वडील तिच्यावर नाराज होते. रिंकीचे वडील प्रेम सिंह, भाऊ अंकित आणि मामा देशराज यांनी 27 ऑगस्ट रोजी रिकींच्या घरात घुसून तिच्या डोळ्यांदेखत मनीषची निर्घृण हत्या केली. या घटनेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. पतीच्या हत्येनंतर रिंकी पाच महिन्यांच्या मुलाला घेऊन फतेहपूर येथील गौसपूर येथे सासरी आली होती. मात्र, तिच्या जीवाला देखील धोका असल्याची पाहून मनीषच्या आई-वडिलांनी रिंकी आणि मुलाला त्यांच्या एका नातेवाईकाच्या गावात पाठवले होतं. मात्र, रिंकीने गुरुवारी रात्री आत्महत्या केली.

हेही वाचा...भाजपच्या महिला आमदार कोरोना पॉझिटिव्ह, मराठा मोर्चाच्या बैठकीला होत्या उपस्थित

मी माझ्या पतीकडे जात आहे...

'मला माफ करा, मी माझ्या पतीकडे जात आहे. माझ्या पतीचे मारेकरी असलेले वडील, भाऊ आणि मामाला कठोर शिक्षा करा. ते कोणत्याही परिस्थितीत सुटू नयेत, असं रिंकीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठी म्हटलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 13, 2020, 8:48 PM IST

ताज्या बातम्या