कॉलेज युवकाची निर्घृण हत्या करून झुडपात फेकला मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण

कॉलेज युवकाची निर्घृण हत्या करून झुडपात फेकला मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण

कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग-धंदे ठप्प झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

  • Share this:

भिवंडी, 13 सप्टेंबर: कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग-धंदे ठप्प झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेरोजगारीतून एका तरुणाची हत्या झाली आहे. सोन्याच्या साखळीसाठी एका कॉलेज तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावात ही घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा....कंगना रणौतच्या अडचणीत वाढ! मुंबई महापालिकेनं दिला आणखी एक जबरदस्त झटका

आकाश नारायण शेलार (21) असे निर्घृण हत्या झालेल्या कॉलेज तरुणाचे नाव आहे. तो खडवली येथील महाविद्यालयात कला शाखेत पदवीच्या दुसऱ्या वर्षाला होता. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे कॉलेज बंद आहे. त्यामुळे तो वासींद येथील जिंदाल कंपनीमधे काम करीत होता. शुक्रवारी सायंकाळी तो चार वाजेच्या सुमारास घरी असताना त्याला अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून फोन करून गावालगतच्या शेपटीच्या माळरानावर बोलावून घेतले. त्यावेळी तो मोबाईलवर बोलत बोलत त्या ठिकाणी गेला असता मारेकऱ्यांनी त्याचा गळा आवळून हात व डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह गावाजवळील एका शेतात फेकून पळ काढला.

या घटनेची माहिती वडील नारायण शेलार यांना मिळताच त्यांनी पडघा पोलीस ठाण्यात या हत्येची माहिती देताच एपीआय पी.जे.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झालं. पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात पडघा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र, दुचाकी घेण्यासाठी आकाशची हत्या करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

मारेकऱ्यांच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पोलिस पथके तयार करण्यात आली आहे. पडघा पोलिसांनी  गावातील  मयुर मोतीराम जाधव (20) या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

धक्कादायक प्रकार आला समोर...

ताब्यात घेतलेला संशयित आरोपी मयुर जाधव याची पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुचाकी घेण्यासाठी त्याला पैशाची गरज होती. आकाशच्या गळ्यात एक तोळ्याची सोन्याची साखळी होती. सध्या सोन्याचा दर वाढला आहे. सोन्याची साखळी मोडून चांगले पैसे येतील. म्हणून आकाश याला बहाण्याने बोलावून त्याच्या डोक्यात बॅटने  एकपाठोपाठ प्रहार केले. त्याने जागेवरच प्राण सोडल्यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल घेऊन आरोपी मयुर फरार झाला होता.

हेही वाचा...मराठा आरक्षणाबाबत फडणवीस यांच्याशी काय झालं बोलणं? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

पोलिसांनी आकाशाचा मोबाईल, सोन्याची साखळी आणि बॅट जप्त केली आहे. मात्र, आरोपीचा आणखी एका साथीदार असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 13, 2020, 2:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading