मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! तरुणाने काकीसोबत केलं असं काही आईने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

धक्कादायक! तरुणाने काकीसोबत केलं असं काही आईने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर हल्ला, धारदार शस्त्राने मुंबईतील तरुणाला केलं ठार 
 (प्रातिनिधिक फोटो)

चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर हल्ला, धारदार शस्त्राने मुंबईतील तरुणाला केलं ठार (प्रातिनिधिक फोटो)

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

    जोधपूर, 21 ऑक्टोबर : जोधपूर (Jodhpur News) ग्रामीण भाग देचू येथील एका गावात राहणाऱ्या तरुणाने आपल्या काकीची (Crime News) हत्या केली. याबद्दल कळताच तरुणाच्या आईनेही स्वत:ला संपवल. मिळालेल्या माहितीनुसार, काकीने तरुणावर अनेक आरोप लावले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकी आणि पुतण्यामध्ये वाद झाल्यानंतर तरुणाच्या आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. (Shocking mothers committed suicide by jumping into a well as the young son did with his aunt) पुतणा व काकीमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावेळी काकीने पुतण्यावर अनेक धक्कादायक आरोप केले होते. यामुळे दोघांमधील वाद वाढीस लागला. आणि रागाच्या भरात तरुणाने काकीची धारदार शस्त्राने वार (Murder) करून हत्या केली. यानंतर महिलेला रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. याबाबत जेव्हा तरुणाच्या आईला कळालं तर तिला मोठा धक्काच बसला. अशा अवस्थेत काय करावं हे तिच्या लक्षात आलं नाही. हे ही वाचा-प्रेयसीला अधिकारी बनवण्यासाठी हा झाला चोर; ऑफिसातून तब्बल 1.75 कोटी लंपास तरुणाने आईने घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणातही तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना कळवताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणात अधिक तपास सुरू केला आहे. कोरोनानंतर देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यातही चोरी आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये प्रामुख्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातातील नोकऱ्या गेल्या त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Murder

    पुढील बातम्या