जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / घरातून रागाने बाहेर पडलेला संतोष परतलाच नाही, धरणाजवळ बाइक आढळली आणि...

घरातून रागाने बाहेर पडलेला संतोष परतलाच नाही, धरणाजवळ बाइक आढळली आणि...

घरातून रागाने बाहेर पडलेला संतोष परतलाच नाही, धरणाजवळ बाइक आढळली आणि...

रात्री उशिरापर्यंत संतोष काही घरी परत आला नाही. तो घरी न परतल्यामुळे घरच्या लोकांनी मोबाईलवर संपर्क साधला. परंतु…

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रवीण तांडेकर, प्रतिनिधी गोंदिया, 14 जुलै : सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणात तरूणाने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतक तरूणाचे नाव संतोष शामलाल दोनोडे (वय 24) असं आहे. संतोष दोनोडे हा साखरीटोला (सातगाव) येथील रहिवासी आहे. घरी कुठल्या तरी कारणावरुन वाद झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात संतोष घरातून बाहेर पडला. संतोष आपली मोटारसायकलने घेऊन निघून गेला होता. घरच्यांना वाटलं राग शांत झाला की, तो परत येईल. मात्र, रात्री उशिरापर्यंत संतोष काही घरी परत आला नाही. तो घरी न परतल्यामुळे  घरच्या लोकांनी मोबाईलवर संपर्क साधला. परंतु, त्याने प्रतिसाद दिला नाही. रिक्वेस्ट न पाठवताही फेसबुक प्रोफाइलमध्ये घुसली अनोळखी व्यक्ती, डोंबिवलीत खळबळ त्यानंतर संतोष कुठे मित्राकडे गेला आहे, याचा शोध घेतला. पण, त्यांच्याकडेही तो सापडला नाही. कुठल्या नातेवाईकाकडे गेला आहे, याची विचारपुस केली असता त्यांनीही नकार दिला. रात्रभर संतोषचा शोध घेण्यात आला पण, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. सकाळी धरणावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या काही लोकांना एक मोटारसायकल दिसली. मोटारसायकलच्या डिक्कीत संतोषने मोबाईल आणि पैसे ठेवले होते. डिक्कीत मोबाईलची रिंग वाजत असल्याने मच्छिमारांना शंका आली. फोनवरील नंबर बघून त्याच्या घरच्यांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर पोलिसांनाही याबद्दल कळवण्यात आले. महानायकासाठी महामृत्युंजय यज्ञ; कोरोनामुक्त होईपर्यंत चाहता यज्ञात आहुती देणार पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धरणाच्या परिसरात संतोष आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं.  संतोषचा मृतदेह धरणा बाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संतोषने धरणात उडी टाकून आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्राथमिक तपासातून घरगुती वादातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात