महानायक अमिताभ यांच्यासाठी महामृत्युंजय यज्ञ; कोरोनामुक्त होईपर्यंत चाहता यज्ञात आहुती देणार

महानायक अमिताभ यांच्यासाठी महामृत्युंजय यज्ञ; कोरोनामुक्त होईपर्यंत चाहता यज्ञात आहुती देणार

अमिताभ बच्चन (amitabh bachchan) कोरोनातून बरे व्हावेत यासाठी चाहते काय काय नाही करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाल्याचं समजताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. अमिताभ कोरोनामुक्त व्हावेत यासाठी चाहते काय काय नाही करत आहेत. पश्चिम बंगालच्या कोलकात्यामधील (Kolkata) अशाच एका चाहत्याने (amitabh fans) त्यांच्यासाठी महामृत्युंजय यज्ञ (mahamrityunjay yagna) सुरू केला आहे.

अमिताभ यांचा फॅन विजय पतोडिया याने अमिताभ लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी महामृत्युंजय यज्ञ केला आहे. जोपर्यंत अमिताभ कोरोनामुक्त होणार नाहीत, तोपर्यंत आपण यज्ञामध्ये आहुती देत राहणार, असं विजय यांनी सांगितलं. एएनआयने याबाबत ट्वीट केलं आहे.

याआधी मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात पंडितांनी अमिताभ लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी यज्ञ केला होता. नंदिराचे मुख्य पंडित दिनेश गुरू त्रिवेदी यांच्या नेतृत्वात 11 पंडितांनी जप केला. रविवारी दोन तास हा जप सुरू होता.

अमिताभ यांच्यासाठी इतक्या लोकांनी प्रार्थना केली की ते पाहून अमिताभ भावुक झालेत. अमिताभ यांनी कवितेच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानलेत. मी तुमच्यासमोर हात जोडून आणि नतमस्तक होऊन तुमचे आभार मानतो असं अमिताभ म्हणालेत.

शनिवारी रात्रीच बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले.

हे वाचा - शीश झुकाके नत मस्तक हूँ मैं! Corona शी लढणारे अमिताभ बच्चन झाले भावुक

यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

हे वाचा - 'वेळच तर आहे निघून जाईल', कोरोनाग्रस्त अमिताभ यांच्या प्रेरणादायी कवितेचा VIDEO

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली. अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ऐश्वर्या आणि आराध्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

Published by: Priya Lad
First published: July 14, 2020, 7:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading