रिक्वेस्ट न पाठवताही फेसबुक प्रोफाइलमध्ये घुसली अनोळखी व्यक्ती, डोंबिवलीत उडाली खळबळ

रिक्वेस्ट न पाठवताही फेसबुक प्रोफाइलमध्ये घुसली अनोळखी व्यक्ती, डोंबिवलीत उडाली खळबळ

'आम्ही याला कधीच आमच्या फ्रेंडलिस्टमध्ये अ‍ॅड केले नव्हते. तरी तो आला कसा ? हा प्रश्न आहे आणि अजून त्याचे दोन-तीन अकाऊंट असल्याचे समजले.'

  • Share this:

डोंबिवली, 14 जुलै : तुमच्या फेसबुक अकाऊंटमध्ये जोपर्यंत फ्रेंड रिक्वेस्ट येत नाही, तोपर्यंत कुणी मित्र अॅड होत नाही. पण,  सिंगापूर स्थित एका अपरिचित फेसबुक अकाऊंटधारकाच्या घुसखोरीमुळे कल्याण-डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. एकाच नावाने दोन-तीन अकाऊंट असलेली ही व्यक्ती डोंबिवलीतील अनेक अकाऊंटधारकांच्या फ्रेंडलिस्टमध्ये आढळून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर काहींची घाबरगुंडी उडाली आहे.

सोशल मीडियामध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या फेसबुकवर फेक अकाऊंट उघडून अनेक हॅकर्स झोल करत असतात. फेसबुकच्या हे लक्षात आल्यानंतर, तसेच   तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या फेसबुकने मध्यंतरी आपल्या प्लॅटफॉर्मवरुन तब्बल 5.4 अब्ज अकाऊंटवर कारवाई करत ही अकाऊंट डिलीट केली होती. फेसबुकवर अनोळख्या व्यक्तींना भेटणे त्यांच्याशी संवाद साधणे महागात पडू शकते आणि यात तुमची फसवणूकही होऊ शकते. तर काही वेळेस ही फेसबुकची फ्रेंडशीप तुमच्या जीवावरही बेतू शकते. हीच बाब लक्षात ठेवून जागरूक डोंबिवलीकरांच्या नजरेस विचित्र प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक: सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातल्या चार जणांची आत्महत्या

रविवारी रात्रीच्या सुमारास फेसबुक चाळवणाऱ्या डोंबिवलीतील अनेक अकाऊंटधारकांना त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये अचानक एक व्यक्ती घुसली आणि अनेकांना ती अपरिचित व्यक्ती असल्याचे आढळून आले. काहींना संध्याकाळच्या सुमारास अचानक Facebook notification (सूचना) आली. Simon Wei नावाच्या माणसाने तुमची Friend request accept केली आहे. तर याबाबतीत मंदार अभ्यंकर या जागरूक नागरिकाने सांगितले की, 'अशी कुठल्या माणसाला मी ओळखत नाही, त्यामुळे friend request चा प्रश्नच नाही.  फेसबुकवर जाऊन तेथे प्राथमिक तपासणी केली केली असता Simon Wei याच्या प्रोफाईलमध्ये तब्बल 90 mutual friend दिसून आले. त्या लिस्टमध्ये जागरूक नागरिक, राजकीय मंडळी आणि पत्रकार आहेत. त्यातील काही जणांना याची कल्पना देत ब्लॉक करण्यास सांगितले.

याबाबतीत काही जणांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 'आम्ही याला कधीच आमच्या फ्रेंडलिस्टमध्ये अ‍ॅड केले नव्हते. तरी तो आला कसा ? हा प्रश्न आहे आणि अजून त्याचे दोन-तीन अकाऊंट असल्याचे समजले.

एकंदरीतच सध्या फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवर फसवणुकीचे प्रकार घडत आहेत ते पाहता सदर संशयित प्रोफाईल अनेक अकाऊंटधारकांनी unfriend आणि ब्लॉक केले. तसेच माहितीतल्या अनेकांनी एकमेकांना माहिती कळवून सावधान केले.

पावसाळ्यात त्वचाविकार बळावण्याचा धोका; अशी घ्या त्वचेची काळजी

त्यानंतर मात्र प्रत्येकाने त्यांच्या प्रोफाईलच्या फ्रेंड लिस्टमधील Simon Wei या व्यक्तीला unfriend आणि block केले. जर कुणी Simon Wei या व्यक्तीला ओळखत नाही आणि friend request देखिल पाठवली नाही तर ही प्रोफाईल एवढ्या लोकांच्या फ्रेंड लिस्टमध्ये आली कशी ? असा साऱ्याच अकाऊंट धारकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

Published by: sachin Salve
First published: July 14, 2020, 8:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading