मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते?

कट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते?

 सनातनच्या साधकांवर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही सनातनच्या साधकांवर आणि संस्थेवर अनेक गंभीर आरोप झाले आहेत.

सनातनच्या साधकांवर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही सनातनच्या साधकांवर आणि संस्थेवर अनेक गंभीर आरोप झाले आहेत.

सनातनच्या साधकांवर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही सनातनच्या साधकांवर आणि संस्थेवर अनेक गंभीर आरोप झाले आहेत.

विजय देसाई, नालासोपारा, ता.10 ऑगस्ट : नालासोपाऱ्यात देशी बॉम्ब सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला वैभव राऊत हा सनातन संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय. पण सनातनच्या साधकांवर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. मालेगाव बॉम्बस्फोट आणि विवेकवादी विचारवंतांच्या हत्येच्या कटांचे आरोपही सनातनच्या सधकांवर झाले आहेत. नालासोपारा देशी बॉम्ब प्रकरणी वैभव राऊतला अटक झाल्याने संशयाची सुई पुन्हा एकदा सतानन या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेकडे वळलीय. अटक करण्यात आलेला आरोपी वैभव राऊत हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय. त्याच्याकडून पोलिसांनी 8 देशी बॉम्बसह इतरही घातक सामुग्री हस्तगत केली आहे. पण सनातन संघटनेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी मात्र, त्याच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. हा पोलीसांचाच कट असल्याचा आरोप त्यांनी केला.

नालासोपारा स्फोटकं प्रकरणात आणखी एकजण ताब्यात

हिंदुत्ववादी वैभव राऊत यांची अटक म्हणजे 'मालेगाव पार्ट २' !

आता एक नजर टाकुयात सनातन संघटनेवरील यापूर्वीच्या आरोपांवर.
  • मालेगाव बॉम्बस्फोटातही सनातनच्या साधकांवर आरोप झाले होते
  • मडगाव स्फोटातही सनातनच्या एका साधकाचा मृत्यू झाल्याचा संशय
  • ठाण्यातील गडकरी रंगायतन स्फोट प्रकरणी 2 साधकांना शिक्षा
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातही सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक, जामिनावर सुटका
  • कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातही सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक, नंतर जामिनावर सुटका
  • पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी सनातनचा साधक अमोल काळेला अटक
औरंगाबादमध्ये बंद कंपन्यांमध्ये घुसून आंदोलकांनी केली तोडफोड, 50 कोटींचं नुकसान विवेकवादी विचारवंताच्या हत्यासत्रांमध्ये वारंवार सनातनच्या साधकांची नावं समोर आल्याने या कट्टर हिंदुत्वादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी होतेय. पण काँग्रेसच्या काळातच या संघटनेवरील बंदीची कारवाई बारगळल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. दरम्यान सनातन संघटनेकडून साधकांवरील स्फोटांसंबंधीचे आणि हत्यांसंबधीचे आरोप फेटाळण्यात आले होते. मात्र एटीएसच्या ताज्या कारवाईमुळे सनातनवर करावाई अटळ मानली जातेय.  
First published:

Tags: Hindu, Jayanta aathawale, Sanatan ashram, Sanatan sanstha, जयंत आठवले, सनातन आश्रम, सनातन संस्था, हिंदू

पुढील बातम्या